पोलीस भरतीला विलंब, तरुणांमध्ये निराशा, विधीमंडळात आवाज उठविणार! : आ. कुणाल पाटील
धुळे : वय निघून चालले…! बेरोजगारांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे पोलीस भरती लवकरात लवकर घेण्यात यावी म्हणून मी विधानभवनात लढा देणार असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले. पोलीस भरतीसाठी तयारी करणार्या धुळे तालुक्यातील युवक-युवतींनी आ. कुणाल पाटील यांची भेट घेतली. भरती प्रक्रीयेबाबत शासनाच्या चुकीच्या धोरणाविषयी तरुणांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाने तत्काळ पोलीस भरती करुन तरुणांना न्याय द्यावा या मागणीसाठी धुळे तालुक्यातील कापडणे, देवभाने, सरवड, मोरदड तांडा
यावेळी तरुणांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढत चालली असून तरुणांमध्ये निराशा पसरली असल्याची कैफीयत मांडली. आ. पाटील यांच्याशी चर्चा करतांना पोलीस भरतीसाठी तयारी करणार्या युवक-युवतींनी सांगितले कि, आमचे आईवडील काबडकष्ट करुन आम्हाला शिकवतात. आम्हीही दररोज पोलीस भरतीसाठी तयारी करीत असतो. मात्र महाराष्ट्र सरकार अद्यापही भरती करीत नसल्याने ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.
पोलीस भरतीची तयारी करणार्या उमेदवारांचे वय निघून चालले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये निराशा वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2023-2024 ची भरती मार्च 2024 पूर्वी करण्यात यावी. त्यासाठी विधीमंडळात पोलीस भरतीचा विषय प्रभावीपणे मांडून भरतीयोग्य तरुणांसाठी लढावे अशी मागणी तरुणांनी केली.
तरुणांसोबत चर्चा करतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, महाराष्ट्र शासनाने मार्च 2024 च्या आत पोलीस भरती घ्यावी यासाठी नागपूर येथे डिसेंबर महिन्यात होणार्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लढा दिला जाईल. धुळे तालुक्यासह राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणार्या तरुणांचा आवाज बनून लढणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याने भेटण्यासाठी आलेल्या तरुणांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी महेश देसले, दीपक जाधव, महेश चव्हाण, भावेश भदाणे, संग्राम बागले, पंकज पाटील, करण गुरव यांच्यासह उपस्थित असलेल्या तरुणांनी निवेदन दिले.
हेही वाचा