मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही! धुळ्यातील सभेत मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
धुळे : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर खूपच टीका करतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी धुळ्यातील सभेत व्यक्त केला. दरम्यान राज्यभर जरांगे पाटील यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत असताना धुळ्यातील सभेला मात्र अपेक्षित गर्दी जमली नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची धुळ्यातील सभा फारशी प्रभावी ठरली नाही. सभा घेणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संयोजन समितीमध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे. लाखो लोकांच्या उपस्थितीऐवजी काही हजार लोकांच्या उपस्थितीत सभा पार पडली. दुपारी बाराची सभा तीनला झाली. त्याला संयोजन समितीतील मतभेद जबाबदार असल्याचेही बोलले जात आहे.
जरांगे पाटील यांच्या सभेला अपेक्षित गर्दी जमली नाही. याबाबत आता कारणमिमांसा केली जात आहे. संयोजन समितीत मतभेद झाल्याची चर्चा होती. सभास्थळ आणि जरांगे पाटील यांचे स्वागत या मुद्यांवरून संयोजन समितीत मतभेद झाल्याची चर्चा आहे. सभेला लाखो लोकांची उपस्थिती राहील, असे गृहीत धरून संयोजकांनी व्यासपीठापासून तीनशे मीटरच्या परिघात एलईडी स्क्रीन लावले होते. परंतु व्यासपीठासमोरच पुरेशा प्रमाणात गर्दी नव्हती. तर एलईडी स्क्रीनच्या ठिकाणी प्रेक्षकांची प्रतीक्षा होती. जरांगे पाटील सभास्थळी दुपारी बाराऐवजी तीन वाजता पोहोचले. यालाही प्रेक्षकांची गैरहजेही हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. संयोजन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याने पुरेशा गर्दीअभावी सभा पार पाडण्याचे सोपस्कार उरकवावे लागले. विशेष म्हणजे पुरेशी गर्दी नसल्याचे पाहून जरांगे पाटील यांना ”पुढच्या टप्प्यातील सभेला लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा!”, असे आवाहन शेवटी करावे लागले.
मराठा समाजातील अनेकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर मागासलेपण आले आहे. सामाजिक न्यायाची भावना लक्षात घेतली तर सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करावा. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता आपण शांत राहायचे नाही, असे आवाहन आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. आरक्षणाच्या मुद्यावर काही जण जातीय तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आपल्याला दंगली घडू द्यायच्या नाहीत, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला काळाच्या ओघात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीवर मागासलेपण आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर समाजाची प्रगती होईल, अशी मागणी झाली. जालना येथील मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी उपोषण केले आणि त्यानंतर ते नावारूपाला आले. सरकारने मराठ्यांच्या आरक्षणाचा लवकर निर्णय घ्यावा म्हणून जरांगे पाटील जनाधार मिळवत आहेत. धुळ्यातील सकल मराठा समाजातर्फे तीन डिसेंबरला जरांगे पाटील यांची सभा घेण्यात आली. दुपारी बाराची सभेची वेळ असताना जरांगे पाटील सुमारे तीन वाजेच्या आसपास सभास्थळी पोहोचले. यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठ्यांची वस्तुस्थिती सरकारला माहित आहे. जुनी कागदपत्रे पाहिल्यानंतर मराठे हे कुणबी पाटील दिसतात. त्यामुळे त्यांना सरसकट कुणबी पाटील तथा ओबीसी असल्याचे दाखले द्यावेत. त्यानुसार आरक्षणाचे फायदे द्यावेत. आरक्षण घेतल्याशिवाय आता शांत बसणार नाही, असाही निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
समता परिषदेचे प्रमुख आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील यांनी शाब्दिक हल्ला केला. घटनादत्त पदावर असूनही बेकायदेशीर विधाने करीत दंगली घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आपल्याला दंगली करायच्या नाहीत. सामाजिक न्याय आणि प्रगती करण्यासाठी आरक्षणाची मागणी हाच आपला मुख्य उद्देश आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर सकल मराठा समाजाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर चांगलाच निशान साधला
जरांगे पाटील आज धुळे दौऱ्यावर आले असता जहांगे पाटील यांनी राज्य सरकार सह मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.