आतापर्यंतचा सर्वात हिंसक, अश्लील चित्रपट ‘ॲनिमल’
हिंदी सिनेसृष्टीत आतापर्यंतचा सर्वात जास्त हिंसक असलेला चित्रपट ‘ॲनिमल’ सर्वत्र प्रदर्शित झाला.

चित्रपटाची कथा : चित्रपटाची कथा छान आहे. वडील आणि मुलाचा संघर्ष, वडिलांप्रती असलेले मुलाचे प्रेम हे उत्कृष्ट पद्धतीने दाखवण्यात आले आहे. चित्रपटात येणाऱ्या घडामोडी आकर्षित करतात. एका मुलाची आपल्या वडिलांप्रती असलेली जाणीव, भावना, प्रेम आणि काळजी या विषयावर आहे. एका श्रीमंत घराण्यात जन्मलेला रणविजय म्हणजेचज् (रणबीर कपूर) लहानपणापासूनच बापाच्या प्रेमासाठी संघर्ष करत असतो. रणवीरच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले अनिल कपूर नेहमी आपल्या कामात व्यस्त असल्याकारणाने मुलाकडे बरोबर लक्ष देत नाही. त्यामुळे रणविजय हा आपली मनमानी करत असतो. यालाच कंटाळून वडील त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकतात. कालांतराने जेव्हा तो तरूण होतो आणि परत आपल्या घरी येतो. यावेळीही त्याला तीच वागणूक दिली जाते. यावर पर्याय म्हणून रणबीर कपूर घर सोडण्याचा निर्णय घेतो आणि सोबत आपली प्रेयसी गीतांजली (रश्मिका मंदाना) हिला आपल्या सोबत नेतो.

एका दिवशी टीव्हीवर बातमी येते की, बलवीरसिंग म्हणजे अनिल कपूरवर हल्ला होतो. हल्ला कोणी केला? का केला? हे कोणालाही माहीत नसते. त्यामुळे रणबीर कपूर येतो आणि या सर्वांचा शोध घेतो. आता या हल्ल्यात नेमके कोण कोण सामिल आहे हेच शोधणे रणबीर कपूरच्या जीवनाचा उद्देश बनतो. याच दरम्यान होणारी हिंसा सर्वोच्च पातळीवर जाते. आजवर् कुठल्याही हिंदी सिनेमात आपण बघितली नसेल इतकी हिंसा या चित्रपटात आहे. आता रणबीर कपूर या सर्वांचा शोध घेईल का? हे सर्व तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
चित्रपटाची पटकथा : मध्यंतरापर्यंत चित्रपट एक वेगळीच उत्सुकता निर्माण करतो. जे काही चित्रपटाची उजवी बाजू ते सर्व मध्यंतरापर्यंत दाखवून चित्रपट मोकळा होतो. परंतु मध्यंतरानंतर चित्रपटाचा वेग आणि चित्रपटाबद्दल असलेली अपेक्षा ही थोडक्यात भंग होते. चित्रपट मूळ कथेपासून थोडक्यात भरकटलेला वाटतो आणि चित्रपटाची लांबी जास्त असल्यामुळे थोडा रटाळ वाटतो. चित्रपटाचे संवाद छान आहेत. काही ठिकाणचे संवाद अश्लील असल्याने फारसे प्रभावी वाटत नाहीत. रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांची पिता-पुत्रांची केमिस्ट्री छान दिसून आली. दोघांनीही छान अभिनय केलाय.

खलनायकाच्या भूमिकेत बॉबी देओलने आपल्या वाटेला आलेली छोटीशी भूमिका छान साकारलीय. यासह रश्मिका मंदांना आणि इतर सह कलाकारांनी आपल्या वाटेला आलेल्या भूमिका छान करण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे ते पार्श्वसंगित. अप्रतिम पार्श्वसंगीतामुळे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात. एकंदरीतच हिंसा, बदला, प्रेम या गोष्टींच्या अवतीभोवती फिरणारा हा चित्रपट आहे.

हा चित्रपट आजच्या पीढिला जरी आवडत असला तरी सामान्य प्रेक्षकांना किंवा कुटुंबासोबत चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट कदाचित आवडणार नाही. कारण चित्रपटात अपेक्षेपेक्षाही जास्त हिंसा, अश्लीलता आणि चित्रपटाला मिळालेला ए सर्टिफिकेट हे मुख्य कारण आहे. परंतु हा चित्रपट इतर सर्व प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल आणि बॉक्स ऑफिसवर आपली बंपर कमाई करेल यात तीळमात्रही शंका नाही.

(Mob : 9022835980)
‘एक मुकनायक’ फेसबुक पेजवरून साभार
मनुस्मृतीने स्रियांवर लादलेल्या गुलामीचं समर्थन करणारा… कट्टर सनातन्यांनी डोक्यावर घेतलेला आणि बिघडलेल्या हिंसक प्राण्याला हिरो ठरवणारा ॲनिमल….
रणविजय (रणवीर) एक हिंसक राक्षसी प्रवृतीचा अरबपती बापाचा बिघडलेला मुलगा आहे. ज्याच्या हिंसा करण्यामागे एक बहाणा आहे तो म्हणजे त्याच्या वडीलांचं त्याच्यावर प्रेम नाही. यामुळे तो प्रत्येक ठीकाणी बेफाम हिंसा करत सुटतो…
गितांजली (रश्भिका) एक वारंवार पती रणविजय कडुन अपमानित होऊनही नवर्याचा राग निमुटपणे सहन करणारी आणि याच्या प्रत्येक खुनखराब्याला शांतपणे सहन करणारी सो काॅल्ड बिचारी पत्नी आहे..
खरं तर रश्मिकाचं पात्र एक म्हणजे एक निव्वळ थट्टा आहे. जी स्वतःहुन अपमान स्विकारायला तयार आहे.
रणविजय गीतांजलीला तिच्याचं एंगेजमेंटमध्ये पाहतो… आणि पाहता क्षणी मला ती हवी आहे असं म्हणतो. इथे प्रेमापेक्षा हासिल करण्याची आणि ताबा मिळवण्याची भावना जास्त आहे.
त्यानंतर रणविजय गीतांजलीला त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिचा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो तिला उत्क्रांतीच्या काळातलं उदाहरणं देतो. जे या आधुनिक काळाशी सुसंगत नाही.
जुन्या काळी आई-वडील किंवा जाती नसत, स्त्रिया स्वतःच जोडीदार निवडत. जर तो मर्द जोडीदार अल्फा नसेल तर तुम्ही कोणाची निवड कराल?
इथे जो अधिक हिंसा करणारा तो अल्फा आहे..
एका सीनमध्ये तर रणविजय त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका मुलीला प्रेम सिद्ध करण्यासाठी आपले बुट चाटायला लावतो….
हा चित्रपट पाहुन पुरुषांचा सो काॅल्ड पुरूषी अहंकार पुन्हा जागा झाला तर नवल वाटायला नको.
बाॅबीची एन्ट्री खुप उशीरा आहे आणि त्याने एक बदला घेणाऱ्या एका खतरनाक मुक्या माणसाची भुमिका केली आहे जी चित्रपटाबरोबर फारशी कनेक्ट होत नाही
बर्याच गोष्टी मध्ये लाॅजिक शोधुन सापडणार नाही. कुटुंबातला सहज घडणारा छोट्यातला छोटा संवाद पुढे घडणार्या मोठ्या घटना थांबवु शकला असता असं राहुन राहुन वाटतं…
हाॅटेल मध्ये शंभर दोनशे माणसाच्या कत्तली होतात पण तिथे कोणी पोलिस वगैरे नाहीत म्हणजे अमीर बाप की औलाद आहे म्हणुन त्याला कसलीचं भीती नाही ?
संपुर्ण ॲनिमल चित्रपटात काय असेल तर ते कौटुंबिक वादविवाद आणि हिंसा, बेफाम डायलाॅगबाजी, आणि स्रियांच्या मुलं जन्माला घालण्याच्या क्षमतेवर केल्या जाणाऱ्या टीप्पण्या… आणि स्रियांचं दमण करुन त्यांचा ठासुन ठासुन अपमान….
स्टील आणि ऑईलचा बिझनेस करणारा अरबपती बाप (अनिल कपुर) कामात बिझी असल्यामुळे आपल्या आपल्या मुलासाठी वेळ देऊ शकत नाही. मग ॲनिमल रणवीर कपुर स्वतःला मोठा समजुन आपल्या कुटुंब हाताळण्याचा प्रयत्न करतो.
बहीणीला छेडण्यार्या मुलांना धमकावण्यासाठी काॅलेजमध्ये बंदूक घेऊन जातो. नंतर रागाने वडील त्याला अमेरिकेत बोर्डींग मध्ये घालतात. पण रणविजय काही सुधारण्याचं नाव घेत नाही. आणि अमेरिकतुन परत आल्यानंतर तर आणखी हिंसक होतो..
एकंदरीत हि कथा याचं गोष्टींच्या अधेमधे घुटमळते…
अंधभक्तांना खुश करणारे एक दोन सीन आहेत ज्यामध्ये हिरो गोमूत्र आणि स्वस्तिक चिन्हावर डायलाॅग बाजी करतो. इथे अंधभक्त शिट्या आणि टाळ्या वाजवून थिएटर डोक्यावर घेण्याची शक्यता आहे. आणि या चित्रपटाचा व्हिलन मुस्लिम असल्यामुळे अंधभक्तांना उलट्या उड्या मारण्यासाठी कारणाची गरज नाही.
चित्रपटाचं डायरेक्शन,स्क्रिनप्ले,बॅकग्रा ऊंड स्कोर यांची मांडणी इतकी छान आणि जबरदस्त पद्धतीने केली आहे की तुमचं मन या चुकीच्या गोष्टीसुद्धा मान्य करायला भाग पडते
काही लोकांना हा चित्रपट इतका आवडेल की ते या चित्रपटाला अगदी डोक्यावर घेऊन नाचतील…यात तिळमात्र शंका नाही.
हा चित्रपट पाहण्याआधी मी युट्यूबवर चित्रपटांचे रीव्यु करणारा कट्टर सनातनी हिंदु प्रतिक बोराडे याचा रीव्ह्यु पाहीला होता. आणि इतर कट्टर हिंदु याच्याबद्दल काय बोलतात ते जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. खरंतरं हा चित्रपट कट्टर हिंदू लोकांनी डोक्यावर घेतला आहे….
यातल्या एकाने तर डायरेक्टर संदिप वांगांचा सनातन धर्म मांडणारा खरा कट्टर सनातनी वगैरे म्हणुन गौरव केला आहे…
थिएटर मध्ये हा चित्रपट पाहताना मला एका गोष्टीचं खुप वाईट वाटलं ते म्हणजे स्त्रियांचा अपमान होताना पाहुन स्रियांचं टाळ्या आणि हुटींग करत होत्या….
शेवटी मित्रांनो इतकचं सांगेन
एक अरबपती बाप आणि एक दिवसभर उन्हातान्हात मेहनत मजुरी करणारा बाप…
यांची तुलना होऊ शकत नाही.
ॲनिमल चित्रपट उथळ बनवण्याच्या नादात डायरेक्टरने वडील आणि मुलाच्या नात्यामागे दडलेला भाव मात्र दाखवला नाही. आणि स्वतःच्या बापाच्या प्रेमासाठी तरसलेला बाप आपल्या मुलासोबत प्रेमाने वेळ घालवताना मात्र दाखवला नाही.
आणि राहीला प्रश्न मर्दानगीचा तर मर्दानगी काय असते हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी हजारोवर्षापासुन स्रियांवर होणार्या अन्यायाविरुद्ध लढुन आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून दाखवुन दिले आहे.
त्यामुळे अशा इगोइस्टीक आणि टाॅक्सिक आणि स्रियांचं दमण करणाऱ्या मर्दानगीचं अर्थात मेल मेस्कुलिनिटीचं समर्थन करणाऱ्या ॲनिमल चित्रपटाला माझ्याकडुन 10 पैकी 1 स्टार
फक्तरणबीर आणि कलाकारांच्या अभिनयासाठी….
काही लोकांना हा चित्रपट इतका आवडेल की ते या चित्रपटाला अगदी डोक्यावर घेऊन नाचतील..
पण सुज्ञपणाने विचार करून पाहीलात तर बरचं काही आहे…
(टीप: सध्या सुरु असलेल्या ट्रेन्डमुळे हा रिव्ह्यू लिहावासा वाटला)
एक मुकनायक स्वसिस