धुळ्यात आठ प्रेमी युगुल अश्लील चाळे करताना सापडले
धुळे : येथील देवपूरातील तीन कॅफे शाॅपवर अचानक छापा टाकून पोलिसांनी तरुण-तरूणींच्या आठ जोडप्यांना अश्लील चाळे करताना पकडले. पालकांच्या समोर समज देऊन तरूण-तरूणींची सुटका करण्यात आली. तर कॅफे चालकांवरही कारवाई झाली.
पोलिसांनी छापा टाकला : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना टिप मिळाली होती. त्यानुसार १६ डिसेंबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. धुळे शहरात देवपूरात वाडीभोकर रोडवरील तीन कॅफेंमध्ये तरुण-तरुणींचे अश्लिल कृत्ये चालत असून, सदर कॅफेंकडून गैरुप्रकारास उत्तेजन दिले जात आहे, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. याबाबत खात्री करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा दत्तात्रय शिंदे यांना दिले.
आठ जोडप्यांना चाळे करताना पकडले : स्थानिक गुन्हे शाखा आणि पश्चिम देवपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला असता कॅफे येथे तरूण-तरुणींचे आठ जोडपे अश्लिल कृत्ये करताना आढळले. या तरुण-तरुणींच्या पालकांना संपर्क करण्यात आला. पालकांनी आपल्या मुला-मुलींकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पालकांना केले.
कॅफे मालक ताब्यात : सदर तरुण-तरुणींना अश्लिल हावभाव अथवा अश्लिल कृत्ये करण्याची सोय केल्याच्या मोबदल्यात दोनशे ते तीनशे रुपये तास याप्रमाणे पैसे आकारले जात असल्याची कबुली कॅफे मालकांनी दिली. कॅफे शॉप मालकांवर परवान्याचे उल्लंघन करून गैरप्रकारास उत्तेजना दिल्याप्रकरणी कॅफे मालकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप खोंडे, संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनार, संदीप पाटील, हेमंत प्रकाश बोरसे, पोलीस नाईक शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रल्हाद वाघ, चेतन बोरसे, कॉन्स्टेबल जितेंद्र वाघ, प्रशांत चौधरी, जगदीश सूर्यवंशी, हर्षल चौधरी यांच्या संयुक्त पथकाने केली.
हेही वाचा