धुळे जिल्ह्यात 950 जणांनी दिली पाली भाषा परीक्षा
धुळे : बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर द्वारा, धुळे जिल्हा बुद्ध विहार समन्वय समितीमार्फत रविवार, दिनांक १७/१२/२०२३ रोजी जिल्ह्यातील विविध ३० केंद्रांवर ९५० विद्यार्थ्यांसाठी पाली भाषेच्या विविध स्तरांवरील परीक्षेचे आयोजन सकाळी ११ ते १२ दरम्यान करण्यात आले होते.
सदर परीक्षांमध्ये धुळे तालुक्यात १०, धुळे शहर ५, शिरपूर तालुक्यात ६, साक्री तालुक्यात ४, सटाणा तालुक्यात १, शहादा तालुक्यात २, शिंदखेडा तालुक्यात ३ केंद्रे, या केंद्रांवर सदर परीक्षा ही समन्वयक आणि परीक्षक यांच्या नियंत्रणात आयोजित करण्यात आली. सदर परीक्षा ह्या आतापर्यंत पाच स्तरापर्यंत घेण्यात आल्या आहेत.
ह्या पालीभाषा परीक्षांना वय व शिक्षणाची अट नाही. बुद्धिस्ट तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार तसेच पाली भाषा अवगत होणे, हा उद्देश या परीक्षा घेण्यामागे आहे. संपूर्ण भारतात हया परीक्षा डिसेंबर महिन्यात एकाच दिवशी व एकाच वेळेस घेण्यात येतात. सदर परीक्षांना सर्व स्तरावर बौद्ध व बौद्धेतर उपासक बंधु भगिनी सहभागी होत असतात. ह्या परीक्षांच्या सुरुवातीस बुद्ध वंदना घेण्यात येत असते. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असतो.
सदर परीक्षेसाठी धुळे जिल्हा बुद्ध विहार समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. विलास चव्हाण, समन्वय समितीचे पदाधिकारी डॉ. सुरेश बिऱ्हाडे, इंजी. जी. बी. पवार, राजेंद्र थोरात, बी. बी. साळवे, सुभाष निकुंबे, व्ही. टी. गवळे, डॉ. महेंद्रकुमार वाढे, प्रकाश रणदिवे, प्रभाकर पवार, किशोर शेजवळ, डॉ. संजय ढोडरे, डॉ. नगराळे, डॉ. घोडसे, अनंत भामरे, प्रा. खुशाल कांबळे, नानासाहेब मोरे, आयु. विद्याताई तायडे, सिद्धार्थ शिंदे, डॉ. ललित संदानशीव, वाघोदे गुरुजी, पानपाटील, भीमराव कढरे, नितीन गायकवाड, राजु पवार, दिपक लोंढे, विनोद सोनवणे, रत्नमाला सोनवणे, आण्णा आगळे, ॲड. राहुल वाघ, पानिराज बैसाणे, सुरेंद्र मोरे, भैय्यासाहेब गवळे, कैलास सोनवणे, श्रीकांत बैसाणे, ललिता शिरसाठ, भारती शिंदे, शिवाजी बैसाणे, डॉ. शरद भामरे, प्रा. ईश्वर खैरनार, लोटन वाघ, नानासाहेब देवरे, बी. यु. वाघ, विनोद चव्हाण, विजयानंद शिरसाठ, ॲड. कामिनी वाघ, आनंद सैंदाणे, सिद्धार्थ जाधव आदींनी परिश्रम घेतले.