धुळे(dhule): नीमखेडी ता. धुळे गावात अशय सोशल ग्रुपने प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day) महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम घेतला. ऋतू चक्रातून जाणाऱ्या मुली व स्त्रियांना अशय सोशल ग्रुपतर्फे (ashaya social group) प्रत्येकी चार असे ऋतू कापडी पॅडचे वाटप करून ते का व कसे वापरावे, याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले. गावात या वर्गातील २७० मुली व स्त्रिया आहेत. सर्वांनी हा पर्याय मनापासून आनंदाने स्वीकारला असून तो वापरण्यास तयारही आहेत.
कापडी पॅडच का?
कापडी पॅड (cotten pad) विषयी मार्गदर्शन करताना अशय सोशल ग्रुपच्या सामाजिक कार्यकर्त्या सीमा खंडाळे (seema khandale) यांनी सांगितले की, हल्ली सरसकट वापरला जाणारा पर्याय म्हणजे प्लॅस्टिकचे सॅनिटरी नॅपकिन्स. हे खरेतर आरोग्यासाठी अयोग्य ठरतात. तसेच, महिन्याला एक स्त्री किंवा मुलगी साधारणपणे कमीतकमी १२-१५ पॅड वापरते. पॅड वापरून झाला की, तो रद्दी पेपरमध्ये गुंडाळून प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून रोजच्या कचऱ्यात फेकून दिला जातो. प्लॅस्टिकचे जमिनीत विघटन होत नाही. परिणामी जमिनीचा पोत खराब होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होतो. प्रत्येक महिन्यात सॅनिटरी नॅपकिनचा खर्च देखील वेगळाच. कापडी पॅड हे सुती कपड्याने बनविलेले असते. त्यात एक प्रतिबंधक कापडाचा (pul) थर वापरला जातो. ज्यामुळे, इतर कपडे खराब होत नाही व डाग पडण्याची चिंता राहत नाही. शिवाय, कापडी पॅड धुण्याची पद्धत खूप सोपी आहे. चार कापडी पॅडचा सेट साधारण, तीन-चार वर्षे चालू शकतो. कापडी पॅड हे आरोग्यासाठी सुरक्षित आहेत. तसेच पर्यावरणपूरक व आर्थिक बचत करणारे आहेत. मुलींना पर्यावरणपूरक हा शाश्वत पर्याय देवून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. अशय सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सीमा खंडाळे दरवर्षी असा आगळावेगळा उपक्रम राबवितात. उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. एक गट निवडून त्या गटासाठी स्वेच्छेने लोकवर्गणीतून कापडी पॅड उपलब्ध करून देतात. हे कापडी पॅड कसे व का वापरावे या विषयी जनजागृतीही करतात. स्वतः साठी असे कापडी पॅड कसे बनवावेत या विषयी प्रशिक्षण देतात. कापडी पॅड कसे वापरावे, त्यांची काळजी कशी घ्यावी, ते कसे धुवावे या विषयीची सगळी माहिती सविस्तर पणे सांगण्यात येते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी (nimkhedi village) गावचे सरपंच उमेश उत्तम मोरे, उपसरपंच सुनीता नितीन ठाकरे, ग्रामसेविका मालती पाटील, रोशन खैरनार, आशा वर्कर माया पाटील, शिपाई रावण पाटील, गोपाल पाटील, चेतन पाटील यांनी परिश्रम घेतले.