शिंदखेडा एसएसव्हीपीएस महाविद्यालयात रामानुजन जयंती साजरी
शिंदखेडा : येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागामार्फत राष्ट्रीय गणित दिवस तथा भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. टी. राऊळ यांच्या हस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गणित विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र पाटील यांनी भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यलयीन अधिक्षक राहुल पाटील, गणित विभागप्रमुख प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. राकेश देवरे, प्रा. पंकज भदाणे, प्रा. हरिष बच्छाव, प्रा. प्रधान महाले, प्रा. एम. एच. पाटील, प्रा. वंदना पाटील, प्रा. डिंपल अहिरराव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. तुषार करंके, प्रा. मुकेश पाटील, प्रा. संजय बोरसे, पंकज चव्हाण, प्रा. अरुण पाटील, अनिल पाटील, संदीप पवार, भटू देसले, सुधाकर बोरसे, पंकज साळुंखे यांनी परिश्रम घेतले.