#dhule crime धुळे(dhule) शहराचे आमदार डॉक्टर फारुक शहा (faruk-shaha-mla-dhule) यांच्या संस्थेत चोरी झाली असून, चोरट्यांनी शिवण यंञ लंपास केलेआहेत.
धुळे शहरात आझादनगर परिसरात असलेल्या अक्सानगरमध्ये यंग एकता एज्युकेशन संस्था आहे. या संस्थेत शहरातील गरीब महिला, मुलींसाठी मोफत शिवणकाम शिकवलं जायचं. त्यासाठी येथे शिलाई मशीन व इतर साहित्य होतं. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून संस्था बंद होती. नवीन महिलांसाठी शिवणकाम शिकवण्यासाठी बॅच सुरू होणार आहे. त्यासाठी तयारी करण्यासाठी गेले असता संस्थेच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आतमध्ये सामान अस्ताव्यस्त होता. शिलाई मशीन ठिकाणी नव्हते.
आझादनगर परिसरात भुरट्या चोरांचा वावर जास्त आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. परंतु पोलीस (police) प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मदारांच्याच संस्थेमध्ये चोरी झाल्याच्या प्रतिक्रिया आहेत. लवकरात लवकर परिसरातील चोरांचा बंदोबस्त करावा व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.