हद्दवाढ गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी आ. कुणाल पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक
धुळे : ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट गावातील मोराणे प्र. ल., बाळापूरसह पाणी टंचाई भासणार्या गावात तात्काळ पिण्याच्या पाण्याची सोय करणे, मालमत्ता कर कमी करणे, रस्ते, गटारी, पथदिवे अशा विविध मागण्यांसाठी आ. कुणाल यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या दालनात बैठक घेतली. या गावातील नागरीकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावले जातील, नागरीकांची पुन्हा तक्रार येणार नाही असे सांगत आयुक्त दगडे पाटील यांनी बैठकित सकारात्मक भूमिका मांडली.
धुळे महानगरपालिका क्षेत्रांतर्गत हद्दवाढीतील 11 गावातील पाणी प्रश्नासह विविध समस्या सोडविण्यासाठी वलवाडी, नकाणे, भोकर, मोराणे प्र.ल., महिंदळे, अवधान, चितोड, बाळापूर, पिंप्री आणि वरखेडे या गावातील प्रमुख पदाधिकार्यांसोबत आ. कुणाल पाटील यांच्या उपस्थित धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. यावेळी आ. कुणाल पाटील यांनी हद्दवाढीतील गावांमधील विविध समस्यांवर आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. हद्दवाढ गावातील उर्वरीत 40 कर्मचार्यांना मनपाच्या सेवेत कायम सामावून घेण्यात यावे, महानगरपालिका हद्दीतील या गावातील बखळ जागा, खळे, गोठे, गावठाण जूनी मालमत्ता घरे यांना आकारलेला मालमत्ता कर कमी करणे, सीटी सर्व्हे लागू करणे, गटारी, रस्ते, पाणी, वीज, पथदिवे, आरोग्य, स्वच्छता, नियमित कचरा गाडी येणे, मलनिस्सारण, तसेच वरखेडी रस्त्यावर कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो, बेशिस्त वाहतूकीमुळे प्रवाशांमध्ये अपघाताची भिती असते.
त्यामुळे वरखेडी रोडवर पडणारा कचर्याचे निटपणे व्यवस्थापन करावे यासह अनेक समस्या या गावातील पदाधिकार्यांनी मांडल्या. हद्दवाढीतील गावांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली. दरम्यान दरम्यान मोराणे प्र.ल., बाळापूर गावासह हद्दवाढीतील गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशीही मागणी आ. पाटील यांनी यावेळी केली. बैठकित आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत बैठकित मांडलेल्या समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील असे सांगितले तसेच मोराणे प्र.ल., बाळापूर गावातील पाणी समस्या आठवड्यात मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना दिल्या.
बैठकीला आ. कुणाल पाटील यांच्यासोबत महापालिकेचे उपायुक्त संगिता नांदुरकर, कैलास शिंदे, पल्लवि शिरसाठ, माजी सरपंच भटू चौधरी, माजी पं. स. सदस्य छोटू चौधरी, वाल्मिक वाघ, जिल्हा बॅकेंचे संचालक भगवान पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, नगरसेवक शब्बीर पिंजारी, माजी पं. स. सदस्य ज्ञानेश्वर मराठे, धुळे शहर काँग्रेस उपाध्यक्ष बापू खैरनार, मोराणे माजी सरपंच प्रविण सोनवणे, सुनिल ठाकरे, जगदिश चव्हाण, चुनिलाल पाटील, अनिल चित्ते, सामाजिक कार्यकर्ते आबा पाटील, विजय देसले, सादिक शेख, अरुण वाघ, भूषण वाघ आदी उपस्थित होते.