धुळे तालुका हेच माझे कुटुंब : आ. कुणाल पाटील
धुळे : तालुक्यात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाची कामे करीत असतो. त्यामुळे आपल्याला सर्वच पक्षातील कार्यकर्ते विकासासाठी सहकार्य करीत असतात. म्हणून धुळे तालुक्यातील प्रत्येक माणूस हाच माझा पक्ष आहे आणि तालुका हेच माझे कुटुंब असल्याचे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी आज धुळे बाजार समिती येथे आयोजित कार्यक्रमात केले. आ. पाटील यांच्या हस्ते बाजार समितीत व्यापारी गाळ्यांसह विविध कामांचे लोकार्पण आणि भूमीपुजन करण्यात आले.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण आणि भूमीपुजन आज दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. करण्यात आले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने तीस व्यापारी गाळे आणि शुध्द पाणी मिळावे म्हणून आर.ओ.पाणी फिल्टर प्लँन्टचे लोकार्पण करण्यात आले तर गुरे बाजारातील दोन कॉक्रीट रस्ते व भुमीगत गटारीचेही भूमीपुजन आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, ज्या विचारांनी व उद्देशाने बाजार समितीची निवडणूक जिंकली त्यानुसारच आज येथे विकासाची कामे सुरु आहेत. बाजार समितीच्या पदाधिकार्यांनी अत्यंत कमी कालावधीत शेतकरी आणि व्यापार्यांच्या सुविधेसाठी विविध कामे करुन विकासाची घोडदौड सुरु ठेवली आहे. तालुक्यात राजकारण करीत असतांना पक्ष बाजूला ठेवून विकासाची कामे करीत असतो. त्यामुळे धुळे तालुक्यातील प्रत्येक माणूसच माझा पक्ष असून तालुका हाच माझा परिवार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी शेवटी सांगितले.
सभापती बाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बाजार समितीत कामकाज करीत असतांना सर्व संचालकांचे सहकार्य मिळत असते. बाजार समिती शेतकरी व व्यापारी,हमाल मापाडींना सेवा पूरविण्याचा पूरेपुर प्रयत्न करीत आहे. बाजार समितीची आर्थिक घडी बसून शिल्लक वाढविली आहे. येणार्या काळात अव्वल दर्जाची बाजार समिती करणार असल्याचे सभापती बाजीराव पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपसभापती योगेश पाटील, संचालक महादेव परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. लोकार्पण सोहळ्याला जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, संचालक गुलाबराव कोतेकर, साहेबराव खैरनार, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते प्रमोद जैन, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, पं. स. चे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, पं. स. चे माजी सभापती भगवान गर्दे, जिल्हा बँकेचे संचालक भगवान पाटील, जि. प. सदस्य अरुण पाटील, माजी संचालक राजेंद्र भदाणे, आप्पा खताळ, संतोष राजपूत, विशेष कार्यअधिकारी प्रकाश पाटील, बाजार समितीचे संचालक गंगाधर माळी, एन. डी. पाटील, विशाल सैंदाणे, रावसाहेब पाटील, महादेव परदेशी, विजय चिंचोले, संभाजी देवरे, ऋषीकेश ठाकरे, कुणाल पाटील, छाया पाटील, नयना पाटील, विश्वास पाटील, सुरेश भिल, भागवत चितळकर, कृषीभूषण भिका पाटील, शिवाजी अहिरे, माजी सरपंच संतोष पाटील, बापू खैरनार, सागर पाटील, सोमनाथ पाटील, पं. स. सदस्या सुरेखा बडगुजर, माजी सदस्य छोटू चौधरी, दुध संघाचे चेअरमन वसंत पाटील, सरपंच नागेश देवरे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, गंगाराम कोळेकर, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, अर्चना पाटील, हसण पाटील, हिरामण पाटील, सचिव देवेंद्र पाटील, विशाल आव्हाड, देवेंद्रसिंग सिसोदिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी पं. स. सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी केले तर आभार संचालक संभाजी राजपुत यांनी मानले.
हेही वाचा
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी