लोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडीच सरकार स्थापन करेल : रमेश चेन्नीथला
धुळे : देशात आणि जनतेमध्ये काँग्रेसची विचारधारा आहे.त्यामुळे हुकूमशाही सरकार विरोधात लढण्यासाठी काँग्रसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आता सज्ज व्हायचे आहे. ज्या काँग्रेसने आपल्याला सर्वकाही दिले त्याच काँग्रेस पक्षाला आता आपल्याला द्याचे आहे. त्यासाठी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जावून काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहचवावी आणि काँग्रेसला मजबुत करायचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभेच्या सर्व जागा इंडीया आघाडी आणि महाविकास आघाडीच जिंकेल असा विश्वास उत्तर महाराष्ट्र विभाग आढावा बैठकीत व्यक्त करीत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठकीचे धुळ्यात दि.27 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. बैठकिला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा निहाय आढावा
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागतील प्रत्येक जिल्हयातील काँग्रेस पक्षाचा आढावा पहिल्या सत्रात घेण्यात आला. यावेळी धुळे,नंदूरबार,जळगाव,अहमदनगर,ना शिक जिल्हयातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्हयातील पक्षीय माहिती दिली. जिल्हयातील तालुका काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,इंटक,एन.एस.यु.आय यांच्यासह सर्व फ्रंट ऑर्गनायझेशन आणि विविध सेलच्या पदाधिकार्यांशी प्रभारी चेन्नीथला तसेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी चर्चा केली. यावेळी कार्यकारणी विस्तार व पदाधिकार्यांच्या तत्काळ नियुक्त्या करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागतील प्रत्येक जिल्हयातील काँग्रेस पक्षाचा आढावा पहिल्या सत्रात घेण्यात आला. यावेळी धुळे,नंदूरबार,जळगाव,अहमदनगर,ना
आढावा बैठकिच्या दुपारच्या सत्रात धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, ना शिक जिल्हयातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पदाधिकार्यांना उद्देशून बोलतांना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले कि, काँग्रेस पक्षाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. आता काँग्रेस पक्षाला देण्याचे दायित्व आपल्याकडे आले आहे. म्हणून काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत पोहचवून पक्ष मजबूत करण्याचा लढा आपला उभा करायचा आहे. काँग्रेस पक्षाची ही चळवळ शक्तीशाली करुन येणार्या निवडणूकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आता सज्ज व्हायचे आहे. देशातील भाजपा हा पक्ष जाती धर्माच्या नावावर राजकारण करुन लोकांना विभाजित करीत आहे. भगवान श्रीराम आणि मंदिराच्या विरोधात आम्ही नाही. श्रीरामचंद्र प्रभूंवर आमचीही श्रध्दा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू रामचंद्रांनाही राजकारणात आणले. मंदिर अपूर्ण असतांनाही प्राणप्रतिष्ठा केली.अशा प्रकारे धर्माला राजकारणात आणण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी इडी, सीबीआय अशा यंत्रणांचा वापर करुन इंडीया आघाडी तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र काँग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपाच्या हुकूमशाही विरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
मेळाव्यात बोलतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले कि, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन काँग्रेस भूमिका मांडावी. संघटना मजबूत करावी. लोकसभा-विधानसभा जिंकण्यासाठी निवडणूक लढू आणि भाजपाला पायउतार करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खोटे बोलून भाजपाने सत्ता मिळविली.आता मुठभर लोकांसाठी भाजपाचे सरकार काम करीत आहेत. शेतकरी, बेरोजगारी, महागाई, गरीबी अशा विषयांवर बोलायला आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा कोणतेही काम करीत नाही. काँग्रेसचे पन्नासवे राष्ट्रीय अधिवेशन खान्देशातील फैजपूर येथे महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी इंग्राजांचा विरोध न जुमानता स्वातंत्र्याचा विचार या अधिवेशनातून पेरला गेला. त्यामुळे आता लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला लढायचे असल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी शेवटी सांगितले.
विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले कि, भाजपाच्या कार्यपध्दतीतच दोष आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करुन ज्यांना भाजपाने भ्रष्ट्राचारी म्हटले त्यांनाच सरकारमध्ये घेतले. राज्यात बेरोजगारी मोठी आहे. शेतकर्यांचे हाल होत आहे. शेतकर्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला भाजपाला वेळ नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, खान्देशातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्तात काँग्रेस आहे. अनेक संकटे झेलण्याची ताकद त्यांच्या मनगटात आहे. परंतु त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे काम प्रदेश काँग्रेस करावे. देशात राहूल गांधी पंतप्रधान व्हाव अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे.राज्यात काँग्रेसचा पाया मजबूत असून महाविकास आघाडीचे सरकार निश्चित स्थापन होणार आहे. त्यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले तर उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देवू अशी ग्वाही यावेळी आ. कुणाल पाटील यांनी दिली.
आढावा बैठकिनिमित्त झालेल्या मेळाव्याला महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुवा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. हिरामण खोसकर,आ. शिरीष चौधरी, आ. के. सी. पाडवी, आ. पदमाकर वळवी, माजी खा. बापू चौरे, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रवक्ता राजू वाघमारे, भाई नगराळे, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदिप राव, राजराम पानगव्हाणे, नाशिक युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील, माजी आ. डी. एस.अहिरे, माजी आ. वसंत सुर्यवंशी, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, हेमलता पाटील, विनायक देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तुषार शेवाळे, डॉ. अनिल भामरे, रमेश श्रीखंडे, ज्ञानेश्वर वाफारे, अॅड.आकाश छाजेड, दिलीप नाईक, शाम तायडे, शिरीष कोतवाल, करन ससाने, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संचालक गुलाबराव कोतकर, चेअरमन लहू पाटील, माजी पं. स. सभापती भगवान गर्दे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, विजय देवरे, पंढरीनाथ पाटील, संतोष राजपूत, बापू खैरनार, डी. झेड. पाटील आदी उपस्थित होते. आढावा बैठकिचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी केले.
हेही वाचा