जिल्हा बालरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार कानडे, सचिवपदी डॉ. दादाभाई पाटील
धुळे : जिल्हा बालरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.तुषार कानडे यांची तर सचिव म्हणून डॉ.दादाभाई पाटील यांची निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेचे खजिनदार म्हणून डॉ.अविनाश सैंदाणे यांची नियुक्ती झाली आहे.
धुळे जिल्हा बालरोग तज्ञ संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक नुकतीच धुळ्यात पार पडली. बैठकित नवीन जिल्हा कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. जिल्हा बालरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार कानडे, सचिव म्हणून डॉ. दादाभाई पाटील यांची निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेचे खजिनदार म्हणून डॉ. अविनाश सैंदाणे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुनिल पगारे,उपाध्यक्ष डॉ. परिक्षित देवरे, कल्चरल सेक्रेटरी डॉ. महेश अहिरराव, डॉ. सचिन ढोले, डॉ. अभिनय दरवडे यांची निवड झाली आहे.
जिल्हा कार्यकारीणीत डॉ. काबरे, डॉ. अरुणा जोशी, डॉ. जगदिश पाखरे, डॉ. संजय जोशी, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. सुरेश वसईकर, डॉ. जयंत देवरे, डॉ. पुरुषोत्तम राठी, डॉ. राजेश अग्रवाल, यांचा समावेश आहे. शिरपुर तालुका सचिवपदी डॉ. सचिन पाटील, सहसचिवपदी डॉ. विरेंद्र देसले, शिंदखेडा तालुका सचिवपदी डॉ. चेतन बच्छाव दोंडाईचा, सहसचिवपदी डॉ. हितेंद्र पवार, साक्री तालुका सचिवपदी डॉ. गिरीश जैन, सहसचिवपदी डॉ. कपिल देवांग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बैठकित डॉ. संजय जोशी यांना लाईफ टाईम अचिवमेंट पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संघटनेचे कामकाज उत्तमरित्या सांभाळल्याबद्दल मागील कार्यकारीणीचा सत्कार करण्यात आला. दरम्यान येणार्या काळात संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे नुतन अध्यक्ष डॉ.तुषार कानडे यांनी यावेळी सांगितले.