भाजपाचे ‘गाव चलो अभियान’, तुमचा नेता तुमच्या गावात येणार मुक्कामी
धुळे : महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. आता भाजपाने ४ ते १० फेब्रुवारीपासून पर्यत ‘गाव चलो’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात 24 तास एका गावात मुक्कामी राहून बूथ लेव्हलला भाजपाची विविध योजनांसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
भाजपाचे केंद्रीय पातळीपासून राज्यपातळीवरील नेते या अभियानात सामील होऊन २४ तास म्हणजे एक दिवस मुक्कामी असून सर्व आढावा घेतील. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ‘गाव चलो’ अभियानाची घोषणा केली आहे. अशी माहिती आमदार जयकुमार रावल यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर प्रतिभा चौधरी , भाजपचे धुळे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर प्रमुख गजेंद्र अपळकर, माजी महापौर प्रदीप कर्पे, बाळासाहेब भदाणे, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले कि राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गाव चलो अभियान सुरू करण्याचा आदेश दिला असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात 4 ते 11 फेब्रुवारी हे अभियान राबवून जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे. या अभियानात प्रत्येक बुथवर एक प्रवासी कार्यकर्ता आठवडाभर त्याला दिलेल्या बुथवर जाऊन लाभार्थ्यांशी संवाद, युवक- 5- शेतकरी व्यवसायी यांच्या गाठीभेटी घेऊन विविध योजनांची माहिती देईल. शहरातील प्रत्येक प्रभागात देखील हे अभियान राबविण्यात येणार आहे.
तसेच शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे जयकुमार रावल हे जातील. बागलाण तालुक्यातील आरई येथे खा. डॉ. सुभाष भामरे तर शिरपुरचे आमदार काशिराम पावरा पळासनेर, माजी मंत्री अमरिशभाई पटेल हे अमोडे तर धरती देवरे हे लामकानी, बबनराव चौधरी हे वाघाडी गावाला मुक्कामी जाणार आहेत. तर राम भदाणे हे देऊर गावाला जाणार आहेत. बाळासाहेब भदाणे हे नाणे या गावाला जाणार आहेत. विविध पदाधिकाऱ्यांना विविध गावे देण्यात आले आहेत. अशी माहिती भाजप नेत्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा
धुळे महानगर भाजपचे कार्यालय राज्यात गौरवास्पद ठरेल