#anti corruption trap धुळे (dhule): काम करुन देण्यासाठी देवाणघेवाणीचा व्यवहार ठरला. पण लाच स्विकारताना संशय आल्याने लाच न स्विकारता निघून गेलेल्या तलाठ्याला सहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (#anti corruption bureau) पथकाने मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे खंबाळे (khambale-tal-shirpur) येथील असून त्यांच्या वडिलांच्या नावावर खंबाळे येथे शेतजमीन आहे. तक्रारदार यांचे वडील सन 2017 साली मयत झाले असून त्यांचे नावावर असलेल्या शेत जमिनीस काही कारणास्तव वारस लावण्याचे राहुन गेले होते. सदर शेतजमिनीस वारसदार लावण्यासाठी 18 जानेवारी रोजी शिरपूर तालुक्यातील खंबाळे येथील तलाठी (talathi) सुऱ्या पायल्या कोकणी, वय 53 यांनी स्वतः करिता तक्रारदार यांच्याकडून पंच साक्षीदार यांच्या समक्ष प्रथम 7 हजार रूपयांची मागणी केली व नंतर तडजोडीअंती 6 हजार रुपये रक्कम ठरली.
मात्र लाच स्विकारतांना संशय आल्याने लाच न स्विकारता तलाठी शिरपूरच्या दिशेने निघून गेले. तलाठी कोकणी यांनी लाच मागितली मात्र त्यांना संशय आल्याने ती रक्कम घेण्याआधी ते घटनास्थळावरून निघून गेले. यावेळी धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात (shirpur police station) गुन्हा दाखल केला आहे.