प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य, भाजपतर्फे राहुल गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
धुळे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जातीविषयी चुकीचे विधान करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले.
धुळे येथे 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता झाशी राणी चौकात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन करण्यात आले. ‘मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो’, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो, ‘वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
या प्रसंगी गजेंद्र अंपळकर म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेली सुड बुध्दीची भावना तसेच सततच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून राहुल गांधी नेहमीच अशी विधाने करीत असतात. सर्वधर्म समभावाची बिरुदे मिरविणाऱ्या काँग्रेसच्या या नेत्याने आत्मपरिक्षण करावे व पंतप्रधानांची जाहीर माफी मागावी. भाजपाच्या आदरणीय नेत्यांच्या जातीविषयी माहिती न घेता मुक्ताफळे उधुळू नयेत. राहुल गांधींचा तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत.
या प्रसंगी माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, सरचिटणीस यशवंत येवलेकर, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली शिरसाट, महिला मोर्चा सरचिटणीस मोहिनी धात्रक, डॉ. माधुरी बाफना, उपाध्यक्ष ॲड. किशोर जाधव, राजेंद्र खंडेलवाल, उपाध्यक्ष मुन्ना शितोळे, पवन जाजु, आरती पवार सुबोध पाटील, बबनराव चौधरी, सुनील कपिल, भिलेश खेडकर, ईश्वर पाटील, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस पंकज धात्रक, रजनीश निंबाळकर, सचिन पाटील, तुषार भागवत, लहू पाटील, युवराज पाटील, जयंत वानखेडकर, प्रकाशचंद्र उबाळे, बालाजी अग्रवाल, कमलाकर नाना, नेहा अहिरराव, मीनल अग्रवाल, रंजना पाटील, रंजना सोनार, प्रमिला जाधव, उर्मिला पाटील, पुष्पा सातपुते, किरण रुणमळे, श्यामकांत बोरसे, अनिल सोनार, शिव पवार, विनय बेहरे, सागर कोडगिर, आकाश धापटे, भूषण गवळी, लोकेश विभुते, सह प्रसिध्दी प्रमुख अनिल जगन्नाथ सोनार तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.