धुळ्याचा ऑलराऊंडर खेळाडू खालिदची टी-20 च्या महाराष्ट्र संघात निवड
धुळे : शहराची दाट लोकवस्ती असलेल्या जुने धुळे भागातील एका सामान्य कुटुंबातील खालीद शेख जमील शहा या तरुणान क्रिकेट क्षेत्रात नाव कमावलयं. क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर असलेल्या खालीदची टी-20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियान राज्यस्तरीय मॅचेससाठी खेळण्याची संधी दिलीय. छत्रपती संभाजी नगरमध्ये 11 फेब्रुवारीला झालेल्या निवड चाचणीत त्याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. गोव्याच्या मडगावमध्ये 22 ते 25 एप्रिल दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सामन्यांमध्ये तो महाराष्ट्र संघातर्फे खेळणार आहे. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंमधून निवड झाल्यान त्याचं कौतुक होतय.
खालीद हा सामान्य कुटुंबातून आलेला तरुण. त्याचे वडील सामाजिक कार्यकर्ते. खालीदन डी.फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय. सन 2013 पासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. धुळ्यातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानात चालणाऱ्या स्पोर्ट्स मेनिया सेवन क्लबचा तो खेळाडू असून मोसिन शेख त्याचे कोच आहेत. सामान्य परिस्थिती असूनही खालिदला त्याच्या आईवडीलांनी क्रिकेट खेळायला प्रोत्साहन दिलं.
खालीदन क्रिकेटच्या क्षेत्रात स्वतःचच नव्हे तर धुळे शहराचं देखील नाव उज्ज्वल केलयं. म्हणूनच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.
टी-20 असोसिएशनच्या महाराष्ट्र संघात निवड झाल्यानं माझी जबाबदारी वाढलीय. भविष्यात देशासाठी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा त्यान सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील पत्रकार भावनात आयोजित सत्कार समारंभाला पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, मिलिंद बैसाणे, चंद्रशेखर पाटील, नूरखान पठाण, विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सेक्रेटरी सचिन बागुल, माजी कार्यकारणी सदस्य सुनील बैसाणे, विद्यमान कार्यकारणी सदस्य प्रकाश शिरसाठ, आकाश सोनवणे, दीपक शिंदे, पत्रकार दिनेश निकुंभ, जमील शाह, प्रभाकर वाघ, क्रिकेटर खालीदचे वडील जमील शाह उपस्थित होते.
धुळे शहराचे आमदार डॉ. फारूख शाह यांनी क्रिकेटर खालिद शेख याचा सत्कार करुन कौतुक केले.
खालीदन क्रिकेटच्या क्षेत्रात स्वतःचच नव्हे तर धुळे शहराचं देखील नाव उज्ज्वल केलयं. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागिरदार यांच्यातर्फे त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.