जिल्ह्यात भारत जोडो न्याय यात्रेच्या अभूतपुर्व स्वागतासाठी जय्यत तयारी
धुळे : जिल्ह्यात खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो न्याय यात्रेचे अभूतपूर्व असे स्वागत करणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज झालेल्या बैठकीत केला. भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून जिल्हयात ठिकठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात खा. राहूल गांधी यांचे स्वागत केले जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी सांगितले. धुळे जिल्ह्याचे भारत जोडो न्याय यात्रेचे पडसाद दिल्लीत उमटले पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना (उबाठा) नेते माजी आ. अशोक धात्रक यांनी बैठकित केले.
खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 12 मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रेचे धुळे जिल्हयात आगमन होत आहे. तर बुधवार 13 मार्च रोजी धुळे शहरात या यात्रेचे आगमन होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागतासाठी व नियोजनासाठी आज 9 मार्च रोजी सकाळी 10 वा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना (उबाठा) नेते माजी आ. अशोक धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष व संघटनांची बैठक धुळ्यात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बैठकित भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागताबाबत विचारविनिमय करण्यात आला. सोनगीरपासून तर देवभाने, सरवड, नगाव, नगावबारी, देवपूर, म. गांधी पुतळा, कराचीवाला खुंट, पाच कंदिल, छ. शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकीज यांसह विविध चौकात स्वागताची ठिकाणे निश्चित करण्यात आली. या ठिकाणांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा), तसेच इतर समविचारी पक्ष संघटनांचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत. तर छ. शिवाजी महाराज मनोहर टॉकीजजवळ खा. राहूल गांधी यांच्या चौक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. खा. राहूल गांधी यांचा दोंडाईचापासून ते धुळ्यापर्यंत रोड शो होणार आहे.
बैठकित आ. कुणाल पाटील, शिवसेना (उबाठा) नेते माजी आ. अशोक धात्रक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी आ. प्रा. शरद पाटील, पत्रकर हेमंत मदाणे, डॉ. अनिल भामरे, महेश मिस्तरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित भोसले, ज्येष्ठ नेते साबीर खान, हरिश्चंद्र लोंढे, शिवसेनेचे हेमंत साळंखे यांनी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
महाविकास आघाडीच्या बैठकिला ज्येष्ठ नेते एन. सी. पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील, डॉ. अनिल भामरे, जोसेफ मलबारी, शिरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोहर पाटील, ज्येष्ठ नेते व्ही. यु. पाटील, उत्तमराव देसले, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संचालक गुलाबराव कोतेकर, साहेबराव खैरनार, माजी पं. स. सभापती भगवान गर्दे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, डॉ. एस. टी. पाटील, उपसभापती योगेश पाटील, पंढरीनाथ पाटील, एन. डी. पाटील, ऋषीकेश ठाकरे, दुध संघाचे चेअरमन वंसत पाटील, विजय देवरे, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे, कुणाल पाटील, ज्येष्ठ नेते महेश घुगे, सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, राजेंद्र भदाणे, जितेंद्र भदाणे, किरण जोंधळे, सादीक शेख, विनोद बच्छाव, रवि चौधरी, नगरसेवक शब्बीर पिंजारी, इम्तियाज पठाण, बापू खैरनार, अरुण पाटील, डॉ. दत्तात्रय परदेशी, विलासराव पाटील, रविंद्र चौधरी, राजेंद्र खैरनार, जगन्नाथ बैसाणे, सोमनाथ पाटील, हिरामण पाटील, राजीव पाटील, गणेश गर्दे, हर्षल साळुंके, हरीष पाटील, पंकज चव्हाण, किरण नगराळे, आनंदा पाटील, एकनाथ पाटील, संदिप पाटील, सौ. अर्चना पाटील बानुबाई शिरसाठ, हसण पठाण, नाविद शेख, माज मुआजाम, अरबाज शेख, भिवसन अहिरे, हरिभाऊ चौधरी, भोलेनाथ पाटील आदी उपस्थित होते. बैठकिचे सुत्रसंचालन धुळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे यांनी केले तर आभार प्रदेश काँगे्रसचे सरचिटणीस युवराज करनकाळ यांनी मानले.