मोहन मोरे यांना पुरस्कार
धुळे : सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र शासन दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव असते. यंदाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते मोहन मोरे यांना जाहीर झाला आहे.
गेल्या ३५-४० वर्षापासून मोहन मोरे यांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात अविरत काम सुरू आहे. बौद्ध धम्मीय वधू-वर पालक परिचय मेळावे, सामुदायिक विवाह यांचे आयोजन, विद्यार्थ्यांना शासनाच्या स्कॉलरशिप मिळवून देणे कामी मदत करणे, पडल्या नडलेल्यांना मदत करणे, कोविड काळात रुग्णांना बेड मिळउन देणे, अन्यायग्रस्त नागरिकांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळउन देणे, अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करणे, समाजात जातीय सलोखा निर्माण करणे अशी अनेक कामे मोहन मोरे अनेक वर्षापासून अविरतपणें करीत आहेत. अशी कामे करताना कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न करता प्रामाणिकपणे त्यांचे काम सुरू आहे.
जयहिंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम ते शिकवित आहेत. मोहन मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.