देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपच्या हातात पुन्हा सत्ता द्या! भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार यांच आवाहन
धुळे : भारत देशाला महासत्ता बनवायचे असेल तर भारतीय जनता पक्षाच्या हातात पुन्हा सत्ता देण्याच आवाहन पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी शुक्रवारी धुळ्यात पत्रकार परिषदेत केल. गेल्या सहा दशकांमध्ये काँग्रेसन निर्माण केलेल्या समस्या मोदी सरकारन संपविल्या असून भाजपचा या पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट, किरण शिंदे, यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ते शामसुंदर पाटील आदी उपस्थित होते.
काँग्रेसची तब्बल सहा दशके देशावर सत्ता होती. परंतु तरीही त्यांनी देशातील गरिबी कधीही हटविली नाही. उलट दारिद्र्यरेषा गडद होत गेली. तरुणांना रोजगाराच्या नव्हे तर शिक्षणाच्या संधी देखील नाकारल्या गेल्या. शेतकऱ्यांची उपेक्षा केली. महिलांच्या उत्कर्षाच्या संधी नाकारल्या. उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून जनतेलाही दुर्बल मानसिकतेत ठेवल. मात्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात काँग्रेसच्या या सगळ्या समस्या संपविल्या. आता भाजपाचा पुढचा सत्ताकाळ हा विकास आणि समृद्धीचा असेल. विविध योजनांमधून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्प पत्र म्हणजे काँग्रेससारखा आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून, मोदी की गॅरंटी आहे, असा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची जोरदार फिल्डिंग, बूथ प्रमुखच नाही तर भाजपने पन्ना प्रमुखही नेमले
धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. बूथ प्रमुखच नाही तर भाजपने पन्ना प्रमुखही नेमले असून, या पन्ना प्रमुखांना त्यांची जबाबदारी सोपविण्याच काम सुरू झाल आहे. महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी शहरात विशेष लक्ष घातल आहे.
पन्ना प्रमुख आणि त्यांच्या कामकाजाविषयी गजेंद्र अंपळकर यांनी अधिक माहिती दिली…