अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांची भूमिका
धुळे : काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रस्थापित उमेदवारांनाही जमला नाही, असा सर्वसामान्यांना विकासाची आणि न्यायाची हमी देणारा जाहीरनामा एका अपक्ष उमेदवाराने मतदारांसमोर मांडला. धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारी करणारे अब्दुल हाफिज यांनी बुधवारी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साखळी रोडवरील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
शिक्षण, रोजगार, मोफत वीज यासह जनतेच्या मुद्यांवर आपण निवडणुक लढवत असून निवडणुकीत यश मिळाल्यास जनतेला दिलेले सर्व वादे पुर्ण करणार असल्याची ग्वाही धुळे लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज अब्दुल हक यांनी दिली आहे. धुळे शहरातील साक्रीरोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांनी उमेदवारी संदर्भात माहिती देतांना सांगितले की, देशाची सध्याची स्थीती भयानक आहे. बेरोजगारी वाढली आहे. शिक्षण महाग झाले आहे. एमबीबीएससाठी लाखो रुपये असतील तरच प्रवेश मिळतो. देशात विद्वेशाचे वातावरण आहे. सध्या लुटमार सुरु आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी माझी उमेदवारी आहे.
धुळ्याचा आजपर्यंत दुर्दैव म्हणून बाहेरचेच लोक धुळ्याचे खासदार झाले आहे. ते बाहेरचे असल्याने आमचे मुद्दे संसदेत मांडत नाही. दहा वर्षात धुळ्याच्या खासदारांनी काय केले असा सवाल अब्दुल हाफीज यांनी विचारला. शहरासाठी,लोकसभा मतदार संघासाठी, समाजासाठी, देशासाठी इमानदारीने काम करण्याची माझी भुमीका आहे.
रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एमआयडीसी विकसीत करणार, भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घ्यावी, धुळ्यात विद्यापीठाची स्थापना करावी, मतदार संघात जागोजागी स्टडी सेंटर उभारुन विद्यार्थ्यांची राहण्याची, भोजनाची निश्लुक सोय करण्यात येईल. सोलरच्या माध्यमातून मोफत वीज देण्यात येईल. प्रत्येक गावात फिल्टर प्लॉन्ट उभारुन पाण्याची व्यवस्था केली जाईल. शेतकर्यांना वीज खते, मोफत दिले जातील. बेघरांना घर दिले जाईल.असे मुद्दे अब्दुल हाफिज यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात घेतले आहेत.