डांबरी रस्ते 10 वर्ष तर काॅंक्रीट रस्ते 30 वर्ष टिकतील, मावळते सभापती शीतल नवले यांचा विश्वास
धुळे(Dhule): शहरातील रस्ते दर्जेदार होतील यादृष्टीने काम केले आहे. त्यामुळे डांबरी रस्ते दहा वर्ष तर काँक्रीटचे रस्ते किमान ३० वर्ष टिकतील अशा पद्धतीने कामे होतील असा विश्वास स्थायी समितीचे मावळते सभापती शीतल नवले (shitalkumar navale) यांनी व्यक्त केला.
महापालिका (dhule mahanagarpalika) स्थायी समिती सभापती शीतल नवले यांचा सभापतिपदाचा कार्यकाळ संपत असून ८ फेब्रुवारीला त्यांच्या जागी नवीन सभापती विराजमान होतील. या पार्श्वभूमीवर नवले यांनी सोमवारी महापालिकेतील (DMC) त्यांच्या दालनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी स्वतः अभियंता असल्याने महापालिकेच्या अभियंत्यांसोबत बसून रस्त्यांसाठी अंदाजपत्रके तयार केली. रस्ते दर्जेदार होतील यावर माझा भर राहिला आहे. डांबरी रस्ते किमान दहा वर्ष, काँक्रीटचे रस्ते किमान ३० वर्ष टिकतील अशा पद्धतीने कामे होतील. #पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनवर सोलर सिस्टीम कार्यान्व्ति करण्यासाठी शासनाकडे निधी मागितला. ही सिस्टीम कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेचे सुमारे सव्वा कोटी रुपये वीजबिल वाचणार असल्याचे नवले म्हणाले. #भूमिगत गटारींमुळे शहरातील देवपूर भागात काही प्रमाणात नाराजी होती, असंतोषही होता. मात्र विकासकामे करताना थोडेफार सहनही करावे लागते. देवपूरचे चित्र येत्या सहा महिन्यात नक्कीच बदलणार आहे. सहा महिन्यात दोनशे कोटींची कामे देवपूर भागात प्रस्तावित असून उर्वरित धुळ्यासाठी देखील १०० कोटी रुपये निधी मागितला आहे. #शहरातील एलईडी पथदिव्यांमुळे २० ते २५ लाख रुपये वीजबिलात बचत होत आहे. #महापालिकेतील मानधनावरील २६८ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविले. त्यांचे मानधन पंधरा हजार तर अभियंत्यांचे मानधन २५ ते ३० हजार रुपये केले. १५ अभियंत्यांची भरती केली. त्यातील १२ मानधनावर तर तीन कायम आहेत. #मनपात नवीन १०० पदे भरण्याची परवानगी मिळाली आहे. या पद भरतीतून अक्कलपाडा योजना (akkalpada scheem) कार्यान्वित करण्यासाठी ५५ कर्मचारी उपयुक्त ठरतील. #स्वच्छ भारत (swaccha bharat) अंतर्गत बायोगॅस प्रकल्पासाठी (biogas project) कार्यादेश दिला आहे. #महापालिकेच्या नवीन आठ दवाखान्यांना मान्यता मिळाल्यापासून त्यापैकी तीन दवाखान्यांची निविदा प्रक्रिया झाली आहे. #हद्दवाढ क्षेत्रातील ७२ कर्मचारी महापालिकेच्या सेवेत सामाऊन घेतले, अशी माहिती नवले यांनी दिली.