सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाचा सलग तिसऱ्यांदा पदभार स्विकारून रामदास आठवले यांनी रचला इतिहास
मुंबई/ नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय राज्य मंत्रालयात राज्य मंत्री पदाचा पदभार स्विकारला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणुन सलग तिसऱ्यांदा पदभार स्विकारून ना.रामदास आठवले यांनी एक विक्रम केलेला आहे. इतिहास घडवला आहे.आज शासकीय भवन नवी दिल्ली येथील सामाजिक न्याय मंत्रालयात कॅबिनेट मंत्री विरेद्रकुमार यांची भेट घेऊन त्यांनाही मंत्री पद मिळाल्याबद्दल विरेद्रकुमार यांचे अभिनंदन केले.शास्त्री भवनच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात ना.रामदास आठवले यांनी आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्य मंत्री म्हणुन आपला पदभार स्विकारला.त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ.सिमाताई आठवले व अनेक रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते.
दलित, ओबीसी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आपण लवकरच मार्गी लावणार आहेत असा निर्धार ना.रामदास आठवले यांनी आपला पदभार स्विकारताना व्यक्त केला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंर्तगत ज्येष्ठ नागरिक,तृतीय पंथीय, तसेच ओबीसी ,अनुसुचित जाती यांचे विषय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंर्तगत येतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अनेक योजना आहेत.फॉरन स्कॉलरशिप ही महत्वाची शिष्यवृत्ती योजना आहे. त्याच बरोबर दलित मागासवर्गीयांमधुन उद्योजक निर्माण व्हावा यासाठी या उद्योजकांना पुरेसा निधी मिळवून देण्यासाठी व्हेंचर कॅपिटल ही स्किम सुधा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने सुरु केली आहे.या सर्व स्किमच्या पूर्ततेकडे आपण लक्ष देऊन काम करणार आहोत.तसेच देशभरात सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने आश्रम शाळा,व्यसनमुक्ती केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे ओल्ड एज होम आदि योजना भारत सरकारने सुरु केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे देशभरात करण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.
यावेळी हजारो चाहत्यांनी ना. रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले.सलग तिसऱ्यांदा सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्य मंत्री म्हणुन पदभार स्विकारणे हा एक विक्रम असल्याचे मत त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केले आहे.यासाठी ना. रामदास आठवले यांचे देशभरातुन अभिनंदन होत आहे.