खासदार शोभाताई बच्छाव यांना निवडून दिलेली सर्व जनताच खासदार, सर्व मतदारांचे जाहीर आभार : आमदार कुणाल पाटील यांचे प्रतिपादन
धुळे : धुळे लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्छाव यांच्या शारदा नगर, देवपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सर्वच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. धुळेकर जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच विविध विकासकाम करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची सोय व्हावी याकरिता हे कार्यालय सर्वांसाठी खुले असल्याचे आवाहन खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी केले.
या उद्घाटना प्रसंगी आमदार कुणाल पाटील म्हणाले की, ताई आपण नशीबवान आहात. धुळेकर जनतेने आपल्याला खासदार केले. आपण इतके उत्कृष्ट काम करीत आहात की, जसे आपण खासदार नाहीत; धुळे लोकसभा मतदार संघातील जनताच खासदार आहे, असे सर्वांना वाटत आहे. निवडणुकीच्या काळात अनेकांना असे वाटत होते की, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव या नाशिकचे आहेत. त्या धुळ्यात वास्तव्यास असणार नाही. त्यांचे धुळे येथे कार्यालय असणार नाही. परंतु काल झालेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटननंतर असे सिद्ध झाले की याच कार्यालयाच्यावर ताईंनी रहिवासासाठी देखील व्यवस्था केलेली आहे. यावरून खऱ्या अर्थाने त्या धुळ्याच्या रहिवासी झाल्या, असे सिद्ध झाले.
या उद्घाटनाप्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, डॉ. सुशील महाजन, संदीप बेडसे, डॉ. दिनेश बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शरद आहेर, सेवानिवृत्त अधिकारी भा. ई. नगराळे, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, महेश मिस्तरी, अतुल सोनवणे, किरण जोंधळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रणजीतराजे भोसले, जितेंद्र मराठे, बाबा हातेकर, माजी नगरसेवक हाजी इस्माईल पठाण, हाजी साबीर शेठ, वसीम मंत्री, शब्बीर पिंजारी, डॉ. अनिल भामरे, दोंडाईचा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील, डॉ. एस. टी. पाटील यांच्यासह जि. प. सदस्य, प. स. सदस्य, माजी नगरसेवक, सरपंच व धुळे जिल्ह्यातील, मालेगाव, सटाणा, नाशिक येथील आणि सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.