#dhule धुळेः शहरात चाळीसगाव रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ आणि काॅंक्रिट गटारचे बांधकाम होणार आहे. या कामामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार आहे. तसेच फुटपाथमुळे पायी चालणार्यांची सोय होणार आहे. या कामासाठी शासनाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम होत आहे. चाळीसगाव रोडवरील संत कबीर चौकात गुरुवारी दुपारी कामाच्या माहिती फलकाचे अनावरण करुन आमदार फारुख शाह (mala farukh shaha) यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
#महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग (pwd) धुळे तर्फे अर्थसंकल्पीय मंजूर कामांतर्गत मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील (ravindra patil), उप अभियंता धर्मेंद्र झाल्टे (dharmendra zalte), कंञाटदार प्रकाश पांडव, सलीम शाह,नासिर पठाण,गनी डॉलर,आमिर पठाण,डॉ.दिपष्री नाईक,डॉ.पवार,मौलाना शकील,निजाम सैय्यद,आसिफ शाह,रफिक शाह,हालिम शमसुद्दिन,वसीम पिंजारी आणि नागरिक उपस्थित होते.