धुळे (#Dhule): शहरात पहिल्यांदाच ऊर्दू किताब मेळावा (Urdu Kitab Melava) आणि शैक्षणिक ऊत्सव आयोजित करण्यात आला आहे. धुळे येथे बारा पत्थर चौकातील ऊर्दू शाळेत सुरु असलेल्या या किताब मेळाव्याला जिल्ह्यातील ऊर्दू शाळांच्या मुला-मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या समोर मुलींनी शिक्षणाचे, पुस्तकांचे महत्व पटवून दिले. धुळे शहरात 9 फेब्रुवारी रोजी उर्दू शाळा क्रमांक 4/8 बारापत्थर येथे उर्दू किताब मेंळाव्याची सुरुवात शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आली. तर शैक्षणिक उत्सवाचा शुभारंभ पोलीस अधीक्षक संजय बारकुंड (ips sanjay barkund) यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी डॉक्टर अकील अहमद होते. प्रमुख पाहुणे म्हणून सलाम मास्टर, नगरसेवक साबिर खान (sabir sheth), सलीम शाह, वसीम बारी, अफ्फान सर, मुन्नाशेठ, हाजी जाहिद हुसैन, डॉक्टर शब्बीर इकबाल, नगरसेवक नासिर पठाण, श्रीमती पवार उपस्थित होते. उर्दू किताब मेळाव्याचे संयोजक महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना धुळे यांच्या वतीने करण्यात आले . महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना (#maharashtra state urdu shikshak sanghatana) जिल्हाअध्यक्ष नाजिम बेग मिर्जा, शमसुल हसन, अकील अन्सारी यांनी मेळाव्याचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफजाल सर, कुरान पठान, अशफाक सर, हम्द बारी ताला जिल्हा परिषद उर्दू शाळा सोनगीर येथील शिक्षिका शाहीन परवीन यानी केले. महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची स्थापना आणि कार्याबद्दल सखोल माहिती शोएब सर यांनी दिली. पुस्तक मेळाव्याची रूपरेषा जाहिद हुसैन यानी मंडली. उर्दू किताब मेळाव्याला एल. एम. सरदार उर्दू शाळा जैनुल आबेदीन उर्दू शाळा, ईस्लाहुल बनात उर्दू शाळा, हबीबी उर्दू शाळा, निजामपुर उर्दू शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रियाज अहमद, युसूफ पापा, शोएब सर, मोहम्मद हारुन, अन्सार सर, अफजाल सर, इमरान सर, जाकिर सर, शमसुल हसन सर, ईस्माईल सर, नाजिम सर, रहेमान सर, यासमीन मॅडम, आफरीन मॅडम, जकिया मॅडम, नूर जमाल मॅडम, शाहीन मॅडम यांनी परिश्रम घेतले.