कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी निशुल्क निविष्टा मिळणेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
धुळे : तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत खतांचा मोफत पुरवठा होणार आहे.
कृषि विभागामार्फत धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य पुरस्कृत कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 अंतर्गत कापूस पिकासाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी बाबीसाठी लक्षांक प्राप्त झाले आहे. महाडीबीटी पोर्टलवर नॅनो युरियासाठी 281.20 हेक्टरवर व नॅनो डीएपीसाठी 801.5 हेक्टरवर अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार वाटप करण्यात आले. उर्वरित लक्षांक प्राप्त करण्यासाठी कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट, 2024 पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, धुळे व्ही. आर. प्रकाश यांनी केले आहे.
धुळे तालुक्यासाठी उर्वरित शिल्लक लक्षांकानुसार शिल्लक क्षेत्र- नॅनो युरिया-1693.80 हेक्टर, नॅनो डिएपी- 1273.80 हेक्टर इतके आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा, खाते उतारा, आधार कार्ड झेराक्स जोडून अर्ज दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज आपल्या गावातील संबंधित कृषि सहायक यांच्यामार्फत विहित पध्दतीने सादर करावा, असे तालुका कृषि अधिकारी व्ही. आर. प्रकाश यांनी कळविले आहे.