प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना : मच्छिमारांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यावा
धुळे : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतंर्गत मत्स्य व्यवसायाशी निगडीत प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ( अपघात गट विमा योजना) मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येते. जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद, तलाव ठेकेदार, निलक्रांती योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय जयेश बळकटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मच्छिमारांचा मृत्यू अथवा कायमचे अंपगत्व आल्यास 5 लक्ष, कायमस्वरुपी अंशीक अंपगत्व आल्यास 2 लाख 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळते. यासाठी लाभार्थ्यांला कोणताही हिस्सा भरावा लागत नाही.
जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद, तलाव ठेकेदार, निलक्रांती योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) धुळे प्लॉट नंबर 61, स्नेह नगर, खांडल विप्र भवन समोर, धुळे (दूरध्वनी क्रमांक 02562-234744) वर संपर्क साधावा, असेही सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय जयेश बळकटे यांनी कळविले आहे.