बदलापूर प्रकरणी धुळ्यात महाविकास आघाडीसह भाजपतर्फे जोरदार निदर्शने
धुळे : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु या बंदला उच्च न्यायालयाने मनाई हुकूम दिल्याने बंद स्थगिती करण्यात आला. महाविकास आघाडीने शनिवारी राज्यभर काही ठिकाणी मुक आंदोलन तर काही ठिकाणी जोरदार निदर्शने केली. धुळ्यातही आंदोलन करण्यात आले. दरम्यान, भाजपनेही बदलापूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच या घटनेवरून महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचा आरोपही केला.
महाराष्ट्रात अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे. बदलापूर घटनेप्रकरणी सत्ताधार्यांच्या भावना बोथड झाल्या असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. बदलापूर येथील दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणार्या दोषींना तत्काळ फासावर लटकवा, अशी मागणी करीत आमदार कुणाल पाटील यांनी बदलापूर घटनेचा निषेध केला. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनांच्यावतीने शनिवारी महात्मा गांधी पूतळ्याजवळ काळ्या फीती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
बदलापूर येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा पक्ष, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी पार्टी तसेच पुरोगामी संघटनांच्यावतीने शनिवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वजता धुळ्यातील गांधी पुतळ्याजवळ काळ्या फीती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
निषेध आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्त्री, शिवसेना नेते हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, जोसेफ मलबारी, प्रथम महापौर भगवान करनकाळ, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, जि. प. सदस्य अरुण पाटील, डॉ. सुशिल महाजन, शिवसेना नेत्या शुभांगी पाटील, ज्येष्ठ नेते एन. सी. पाटील, प्राचार्य बाबा हातेकर, शिवसेनेचे कैलास पाटील, ललित माळी, हेमा हेमाडे, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, राजेंद्र जैन, रामदास जगताप, धिरज पाटील, गुलाब माळी, माजी नगरसेवक मुझफ्फर हूसैन, गोपाल अन्सारी, अफसर पठाण, रविंद्र चौधरी, सेवा दलाचे राजेंद्र खैरनार, महिला काँग्रेसच्या भावना गिरासे, छाया पाटील, अॅड. करुणा पाटील, अरुण धुमाळ, नंदू यलमामे, छोटू माळी, किरण जोंधळे, सुरेश बैसाणे यांच्यासह महाविकास आघाडी आणि पुरोगामी विचार संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
महाविकास आघाडी राजकारण करीत असल्याचा भाजपचा आरोप : बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचा आरोप करत या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी शनिवारी धुळ्यात जोरदार निदर्शने करत बदलापूर घटनेचा निषेध केला.
बदलापूर जि. ठाणे येथे शालेय बालिकेवर झालेल्या अत्याचाराविरोधात तीव्र निषेध करण्यासाठी तसेच त्यातील बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यासाठी भाजप धुळे महानगर शाखेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात झांसी राणी चौक धुळे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
परंतु या गंभीर आणि लाछंनास्पद विषयावर कुठल्याही राजकीय पक्षांनी स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण न करता सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आणि पीडिता व त्यांच्या परिवारासोबत सहानुभुतीने सर्व पक्षांनी उभे राहुन राज्य सरकारला बलात्काऱ्यांना कडक शासन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी भाजप धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजप धुळे महानगर विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, जिल्हा महामंत्री ओमप्रकाश खंडेलवाल, संदीप बैसाणे, ज्येष्ठ नेते भिमसिंग राजपूत, महेश मुळे, विजय पाच्छापुरकर, जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, सोशल मीडिया संयोजक पवन जाजु, सुनिल कपील, प्रकाश उबाळे, शेखर कुलकर्णी, बिपीनचंद्र रोकडे, मनिषा ठाकुर, शंकुतला जाधव, उमा कोळवले, वंदना थोरात, वंदना सुर्यवंशी, सुलोचना चौधरी, मोहिनी धात्रक, सुनिता सोनार, आरती पवार, निषा चौबे, रंजना पाटील, मिनल अग्रवाल, पुनम सिंह, आरती दिलीप महाले, तुषार भागवत, भुषण गवळी, पंकज धात्रक, गोपाल ईश्वर चौधरी, प्रकाश पाटील, जयवंत वानखेडकर, अमोल मासुळे, सुहास अंपळकर, प्रथमेश गांधी, सुलोचना चौधरी, पत्रकार राजेंद्र सोनार, सागर कोडगीर, प्रशांत बागुल, योगिता बागुल, राजेश पवार, अरुण पवार, सुबोध पाटील, भिलेश खेडकर, भगवान देवरे, किरण चौधरी, जिवन शेंडगे, कमलाकर पाटील, शिवाजीराव काकडे, अनिल थोरात, आनंदा चौधरी, इत्यादी मान्यवरांसह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनीधी उपस्थित होते.