इर्शाद जहागीरदार यांना उमेदवारी मिळालीच कशी?
धुळे : भारतीय जनता पक्षाच्या अजीत पवार गटात असलेल्या इर्शाद जहागीरदार यांच्या बंडखोरीमुळे अजित पवार गटाला खिंडार पडल्याने राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली. दरम्यान, समाजवादी पार्टीने इंडिया आघाडीतर्फे धुळे शहरातून विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याची माहिती इर्शाद जहांगीरदार यांनी जाहीर करताच धुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. इर्शाद जागीरदार यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच त्यांनी बुधवारी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली.
राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले नसताना किंवा कोणत्याही इच्छुकाची उमेदवारी जाहीर झाली नसताना फक्त आणि फक्त इर्शाद जागीरदार यांनाच इंडिया आघाडीची उमेदवारी कशी मिळाली?, अशी शंका राजकीय वर्तुळात आहे. यावर ‘नंबर वन महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इर्शाद जहागीरदार म्हणाले की, “या बाबतीत मला जास्त काही माहीत नाही. परंतु समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते अखिलेश यादव यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी मला सांगितले की, “इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी यांच्याशी माझे स्पष्ट बोलणे झाले आहे आणि त्यांच्याशी अंतिम चर्चा केल्यानंतरच धुळे शहराची उमेदवारी तुम्हाला म्हणजे इर्शाद जागीरदार यांना देत आहोत”, अशी माहिती इर्शाद जहांगीरदार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
धुळे शहर विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या माध्यातून माझी उमेदवारी जाहीर केली आहे. धर्मनिरपेक्ष विचारांचे आणि विकासाचे व्हिजन घेवून आपण धुळे शहराचा बकाल झालेला चेहरा मोहरा बदल्यासाठी विधानसभा निवडणूक लढविणार आहोत. धुळे शहरात सिम्बॉलीक, व्हिजन आणि इश्युबेस काम झालेलेच नाही. त्यामुळे धुळे बकाल झाले आहे. धुळ्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. म्हणून व्हिजनसह इश्युबेस कामाच्या माध्यातून इतिहासात नोंद होईल अशी कामगिरी करायची असल्याचा मानस इर्शादभाई जहागिरदार यांनी व्यक्त केला.
यावेळी इर्शाद जहागिरदार यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष कैलास चौधरी, महिला शहर जिल्हाध्यक्षा जयाताई साळुंखे, उमेश महाले, संजय अहिरे, संजय जगताप, ज्ञानेश्वर पाटील आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 9 सप्टेंबरला साजवादी पक्षात प्रवेश 9 सप्टेंबरला साजवादी पक्षात माझा प्रवेश असून 19 ऑयटोबरला सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची धुळ्यात सभा होईल. अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या माध्यातून माझी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात खासदार शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेईल, अशी माहिती देखील इर्शाद जहागिरदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No.1 Maharashtra
राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी!
धुळे : ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तत्पुर्वी समाजावादी पक्षाने आपल्याला उमेदवारीही जाहिर केली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तसे भेटून स्पष्टपणे सांगितले आहे. आपले पारिवारीक, जिव्हाळ्याचे संबंध कायम राहतील मात्र आता राजकीय संबंध आजपासून संपुष्टात आले आहेत. इंडिया अलायन्सच्या जागा वाटपात आपल्याला धुळे शहरातून समाजवादी पक्षाकडून उमेदवारी जाहिर झाल्याने आपण सायकल या चिन्हावर निवडणून लढणार असल्याचा दावा इर्शाद जहॉंगिरदार यांनी केला.
शहराच्या राजकारणात हिंदु-मुस्लीमांसह सर्व समाज घटकांसाठीचा उच्चशिक्षीत चेहरा, म्हणून ज्यांची ओळख आहे. त्या इर्शादभाईंनी वेगळी भूमीका घेत धुळ्याच्या राजकारणात राजकीय खळबळ उडवली आहे. इर्शादभाई ‘सायकल‘वर स्वार झाले आहेत. समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीतील तिसरा मोठा पक्ष असून इर्शादभाईंना पक्षाने धुळ्यातून आपला उमेदवार म्हणून पक्ष प्रवेशाआधीच जाहीरही करुन टाकले आहे. महाविकास आघाडीचे आपण धुळ्यातून उमेदवार असल्याचे इर्शादभाई यांनी सांगितले. इर्शादभाई आपल्या समर्थकांस समाजवादीपक्षामध्ये लवकरच लखनऊ येथे जावून प्रवेश करणार असल्याचे सांगितले. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्याचेही इर्शादभाई यांनी सांगितले.
धुळ्याच्या स्थानिक राजकारणावर भाष्य करताना इर्शादभाई म्हणाले की, २०२० ते २०२४ या काळात महापालिकेच्या माध्यमातून इतकी बोगस कामे झाली आहेत की त्यांचे ऑडीट केले तर धुळ्यात नवीन जेल उघडावी लागेल. महापालिकेत भ्रष्टाचाराने अक्षरशः कळस गाठला आहे. रस्त्याने जाणारा व्यक्ती घरी पोहचल्यानंतर तोंड धुताना त्याच्या तोंडाला किमान शंभर ग्रॅम धुळ लागलेली असते अशी धुळ्यातील रस्त्यांची स्थिती आहे. हे सर्व बदलण्याची गरज आहे. त्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे. महाविकास आघाडीचा मी चेहरा असून माझी उमेदवारी कन्फर्म असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर प्रदेशातून मला फोन केले. फोनवरुन पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तुम्हाला आमंत्रीत केल्याचे सांगितले. त्याानंतर महिनाभराने मी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना लखनऊ मध्ये जावून भेटलो. या भेटीत त्यांच्याशी धुळ्यातील राजकीय समीकरणावर चर्चा झाली. माझ्या राजकीय वजनाची अगोदरच कल्पना असल्याने पक्ष प्रवेशाआधीच इंडिया आघाडी म्हणजेच पर्यायाने महाविकास आघाडीच्या मदतीने धुळ्याची उमेदवारी सपातर्फे
केवळ तेढ निर्माण करण्याचे काम करुन पोळी भाजली जात आहे. धुळ्यात हिंदु-मुस्लीम एकोप्याने आनंदात राहिले तरच धुळ्याचा विकास शक्य आहे. हेच वास्तव आहे. म्हणूनच या ऐक्यावरच माझा प्रथम भर राहील. ई.सी.डी.हा माझ्या निवडणूकीचा ऍक्शन प्लॅन आहे. एम्प्लायमेंट,करप्शन आणि डेव्हलपमेंट या मुद्यांवर निवडणूक लढविणार असून पी.डी.ए. म्हणजेच पिछडा,दलित, आदिवासी हे घटक नजरेसमोर ठेवून निवडणूक जिंकण्याचा इरादाही भाईंनी बोलून दाखविला. पाच हजार बेरोजगारांना काम देणार असल्याची ग्वाही देखील इर्शादभाईंनी दिली. २००८ पासून मी सामाजिक, राजकीय जीवनात काम करत आहे.
अजीतदादांशी कालच नागपुर येथे भेट घेवून आपली भूमिका मांडली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला आहे. अजितदादा पवार यांना नागपुर येथे तसे भेटून स्पष्टपणे सांगितले आहे. आपले पारिवारीक, जिव्हाळ्याचे तसेच सुखदुखःचे संबंध कायम राहतील मात्र आता राजकीय संबंध आजपासून संपुष्टात आले आहेत. अजीतदादा महायुतीसोबत असले तरीआम्ही मात्र भाजपा विरोधातच लढत राहिलो. धुळ्यात लढाई धर्माची नाही तर विकासाची आहे. धुळेकर जनतेने विधानसभेत निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांच्या कामाचा रिव्हयू घेवून मतदान करावे. राजकारण हे लोकांचे मदत करण्यासाठीचे साधन आहे. परंतु काहींनी राजकारणाला व्यवसाय बनविला आहे. यामुळेच धुळ्याचा विकास खोळंबला आहे. माझी स्विकारहर्ता केवळ एका समाजापूरती नसून संपूर्ण धुळे शहरातील जनतेत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचेही इर्शादभाई म्हणाले.