स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे स्मारकाचा लोकार्पण; श्रीमंत काेकाटे यांचे व्याख्यान
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे यांनी स्वराज्यनिर्मित्तीसाठी दिलले याेगदान सर्वांपर्यंत पाेहाेचणे गरजेचे आहे. त्यासाठी घराेघरी छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी राजे यांचे विचार पाेहाेचले पाहिजे. त्यासाठी स्मारक समितीने विविध कार्यक्रमांचे आयाेजन करावे असे विचार नागपूरचे राजे व छत्रपतींचे १३ वे वशंज असलेले श्रीमंतराजे मुधाेजी भाेसले यांनी व्यक्त केले. ते
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे स्मारकाचा लोकार्पण साेहळ्यप्रसंगी बाेलत हाेते.
देवपूरातील संभाजी गार्डनमध्ये उभारलेल्या उत्तर महाराष्ट्रातील ३० फुटी उंचीच्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे स्मारकाचा लोकार्पण मुधाेजी राजे भाेसले यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी खासदार डाॅ.शाेभा बच्छाव,माजी खासदार डाॅ.सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणाल पाटील, छावाचे प्रदेशाध्यक्ष किशाेर चव्हाण, समितीचे अध्यक्ष नाना कदम व इतर मान्यवरांची उपस्थिती हाेती.याप्रसंगी उपस्थितांना मुधाेजी राजे भाेसले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंी सांगितले की, छत्रपतींना स्वराज्य निर्मि्तीसाठी अनेक अडचणी आल्यात. तसेच संभाजी राजांनाही आयुष्यात अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागले. त्यांचे याेगदान सर्वांसाठी पाेहाेचविण्यासाठी समितीने स्मारकांची निर्मिती केली ही चांगली बाब आहे. परंतु केवळ स्मारक बनवून थांबू नका, त्यांचे आचारविचार आजच्या युवकांमध्ये रूजविण्यासाठी घराेघरी त्यांचे विचार पाेहाेचणे गरजेचे आहे. त्यासाठी जयंती, पुण्यतिथीला समितीने विविध कार्यक्रमांचे आयाेजन केले पाहिजे. यासाठी व मुलासाठी काही याेगादान लागल्यास ते आपण देण्यासाठी तयार असल्याचेही मुधाेजी राजे भाेसले यांनी याप्रसंगी सांगितले.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किशाेर चव्हाण यांनी समितीचा पदसिध्द अध्यक्ष महापाैर व सचिव आयुक्तांना करावा जेणेकरून देखभाल व इतर उपक्रम याेग्य पध्दतीने राबविणे साेईचे हाेते. तर संजय शर्मा यांनी कमी उपस्थिती व कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा समाचार घेतला.
प्रास्ताविक समितीचे नाना कदम यांनी केले. याप्रसंगी स्मारकासाठी करावा लागलेल्या संघर्ष सांगतांना त्यांना अश्रु अनावर झाले. समितीर्फे वीरपिता शिवाजी फकिरा पाटील, वीरमाता सुनिता पाटील,वीरपत्नी हर्षदा खैरनार यांचा सन्मान व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुरूवातीला डाॅ. अभिनव दरवडे,शाहिर गंभीर बाेरसे यांनी पाेवाडा सादर केला.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला. तर आभार प्रदीप जाधव यांनी मानले. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी, आयुक्त अमिता दगडे पाटील, इतर राजकीय पदाधिकारी व शिवप्रेमी नागरीकांची उपस्थिती हाेती.
संभाजी राजे विज्ञानवादी, महिलांबद्दल आदर असणारे राजेकार्यक्रमात श्रीमंत काेकाटे यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, संभाजी राजे यांना साेळा भाषा प्रारब्धत हाेत्या.त्याचप्रमाणे ते तलवारबाजीत तेरबेज हाेते. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना शिक्षणासाठी काशीला पाठविले गेले. अवघ्या ३२ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या संभाजी राजे यांना अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागले. ते विज्ञानवादी व महिलाबद्दल आदर असणारे राजे हाेते. त्यांनी त्या काळात पत्नीला राजसत्ता चालविण्याचा अधिकार देवून महिला समानता दर्शविली हाेती. त्यांचा छळ करीत हत्या करण्यात आल्याचे व्याख्यानात श्री.काेकाेटे यांनी सांगितले.
No.1 Maharashtra