ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी 50 टक्के व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा!
धुळे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत परतावा ओटीएस योजना राबविण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यस्थापक गंगाधर डोईफोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई यांचे जिल्हा कार्यालय, धुळे मार्फत विविध कर्ज योजनेतर्गत धुळे जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदाराने कर्ज वितरीत करण्यात आले आहे. या लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात आली होती. विहित मुदत गेली असताना देखिल बऱ्याच लाभार्थीनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही.
त्यामुळे महामंडळाच्या थकीत लाभार्यांतरसाठी संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्यांडेस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याची सुधारीत एकरकमी परतावा ओटीएस योजना नव्याने राबविण्यात येत आहे. या योजनेचा (एक रकमी परतावा ओटीएस) लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थीनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करून कर्ज मुक्त व्हावे व भविष्यात होणारी संभावित कायदेशिर कार्यवाही टाळावी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि.धुळे डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, ए विंग, तळमजला, सिंचन भवन मागे, साक्री रोड, धुळे ४२४००१ फोन नं.०२५६२-२७८४९७ ई मेल: dmobcdhule@gmail.com वर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यस्थापक श्री. डोईफोडे केले आहे.