भाजपा महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार काशिराम दादा पावरा यांच्या प्रचाराचा शुभारंभ
शिरपूर : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार काशिराम पावरा हे चौथ्यांदा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत वर्णी लागल्यानंतर आ. काशिराम पावरा यांनी मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी चा मुहूर्त साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला. खालचे गाव बालाजी मंदिर, खर्दे बु. येथील श्री दत्त मंदिर येथे मंदिरात दर्शन घेऊन प्रचार नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
आ. काशिराम पावरा यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. आ. पावरा यांनी नागरिकांचे आभार मानले. दररोज मी नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवून दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असतो. विविध लोकहिताचे उपक्रम राबवून हजारो नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे आ. काशिराम दादा पावरा म्हणाले.
आमदार काशिराम दादा पावरा यांच्यासह माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते मोहन पाटील, विजयसिंग गिरासे, दिलीप लोहार, हेमंत पाटील, मनोज धनगर, कन्हैया चौधरी, राष्ट्रवादीचे बाळकृष्ण पाटील, आशिष अहिरे, दिनेश मोरे, आरपीआय चे बाबा थोरात, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी, सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा यांच्यासह भाजपाचे युवा मोर्चाचे योगेश बोरसे, विक्की चौधरी, महिला मोर्चा अध्यक्ष संगिता देवरे, महिला पदाधिकारी यासह विविध आघाडीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.