#mla kunal patil news धुळेः तालुक्यातील शिरधाणे (shirdhane) प्र.नेर गावासाठी एक कोटी 98 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. निधी मंजूर करण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (mla kunal patil) यांनी पाठपुरावा केला. पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचेही भूमिपुजन आमदारांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
#यावेळी बोलतांना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की,धुळे तालुक्यात पाणी पुरवठा योजना, रस्ते, साठवण बंधारे, पाणंद रस्ते असे विविध विकासाची कामे झाली पाहीजे म्हणून महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) सत्ता असतांना आपण कोट्यावधी रुपयांचा निधी मंजुर केला होता. मात्र सत्ता गेल्यानंतर या मंजुर कामांना व निधीला विद्यमान सरकाने स्थगिती आणली आहे. तरी आपण पाठपुरावा करुन तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पन्नास टक्के राज्य सरकार (#state government) आणि पन्नास टक्के केंद्र सरकार (#central government) यांच्या निधीतून जलजीवन मिशन योजनेंतर्गत शिरधाणेसह धुळे तालुक्यात पाणी पुरवठा योजना मंजुर केल्या आहेत. त्याआधी मी राज्य सरकारकडे सदर योजना मंजुर करण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारकडून मान्यता मिळवून घेतली. याकरीता तत्कालीन पाणी पुरवठा मंत्र्याकडे शिफारस केली होती. त्यामुळे सदर योजनेस आधी राज्य सकारची मंजुरी मिळाली होती, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.
विकास कामांना प्रारंभ
#आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने शिरधाणे प्र.नेर ता.धुळे येथे एकूण 1 कोटी 98 लक्ष रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपुजन करण्यात आले. त्याबरोबर आमदार निधीतून अमरधाम बैठक व्यवस्था 10 लक्ष रुपये, गुलाबनगर पाणंद रस्ता 22 लक्ष रुपये, एलईडी लाईट बसविणे 10 लक्ष रुपये, कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकाम 10 लक्ष रुपये ही कामे मंजुर करण्यात आली आहेत. तर आमदारांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांच्या प्रयत्नाने शिरधाणे ते चिंचवार रस्ता डांबरीकरण एकूण 35 लक्ष रुपये आणि गुलाबनगर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून पेव्हर ब्लाक बसविणेसाठी 4 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
#या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड येथील ज्येष्ठ नेते देविदास पाटील, माजी पं.स.सभापती बाजीराव पाटील, जि.प.सदस्य आनंद पाटील, सरपंच सुरेश भिल, माजी उपसभापती दिनेश भदाणे, माजी सरपंच जिभाऊ पाटील, बुरझड उपसरपंच एन.डी.पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ जाधव, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, खंडलाय माजी सरपंच पुंडलिक पाटील, खंडलाय सरपंच आबा पगारे, माजी सरपंच दिनेश पाटील, देऊर सरपंच भाऊसाहेब देवरे, डॉ.विजय देवरे, कुंडाणे सरपंच गवरलाल पाटील, गरताड सरपंच राजीव पाटील, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, टी.आर.पाटील, कन्हैयालाल भदाणे, उखा वाघ, गोरख वंजी पाटील, निसार पठाण, के.टी.पाटील, आर.पी.पाटील, बापू पाटील, राजेंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख पाटील, अशोक पाटील, रतन पाटील, संतोष वाघ, ज्ञानेश्वर महाले, दिलीप पाटील, गोविंदा पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.