#dhule धुळेः दलित वस्त्यांमध्ये विकासकामे होत नसल्याची तक्रार करीत, या वस्त्यांचा निधी जातो तरी कुठे, असा प्रश्न समाज समता संघाने उपस्थित केला आहे.
#धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये दलित वस्तीच्या निधीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी समाज समता संघाचे (samaj samata sagh) जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड (kiran gaikawad) यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर या संघटनेच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी पुन्हा महापालिका (dmc) आयुक्तांची भेट घेतली. 24 जानेवारीला उपायुक्त संगिता नांदुरकर याच्यासोबत बैठक झाली होती. दलित वस्त्यांमधील कामांना प्राधान्यक्रम देउन कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजुनही रस्ते, बंदिस्त गटारी व सामाजिक सभागृह ही कामे हाती घेतलेली नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
#तसेच आयुक्तांनी यात स्वतः लक्ष घालावे आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विकास योजनेंतर्गत सिध्दार्थनगर, नवजीवननगर, देशमुखनगर, भीमनगर, शनीनगर या भागात त्वरीत विकासकामे करावीत. त्यासाठी कामांचे कार्यादेश निर्गमित करावेत आणि तसे लेखी कळवावे, अशी मागणी केली आहे.