#Dhule Police News धुळे : आगामी काळात विविध सण, उत्सव येत आहेत. सर्वधर्मीय नागरिकांनी सण, उत्सव सामंजस्य आणि एकोप्याने साजरे करीत जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले.
आगामी काळात विविध सण, उत्सव येत आहेत. या पार्श्वूमीवर नियोजन सभागृहात आज सकाळी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी देवदत्त केकाण, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक बारकुंड म्हणाले, की आगामी काळातील सण. उत्सवाच्या निमित्ताने पोलिस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. आवश्यक तेथे वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच रात्रीची गस्त वाढविण्यात येईल.
आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरलिकेतर्फे आवश्कतेनुसार उपाययोजना केल्या जातील, असे महापौर श्रीमती चौधरी यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, की आगामी. सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महानगरपलिकेने स्वच्छता विभागाला निर्देश द्यावेत, अशी सूचना केली आहे. नागरिकांनी सण, उत्सव शांततेत साजरे करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. पोस्टर, बॅनर करीता संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक राहील.
यावेळी उपस्थित नागरिकांनी विविध सूचना केल्या.
अपर पोलिस अधीक्षक काळे यांनी प्रास्ताविक केले. पोलिस निरीक्षक धिरज महाजन यांनी आभार मानले. यावेळी नागरिक, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.