धुळेकरांनी जल्लोषात केले छञपती शिवरायांना अभिवादन:
#chatrapati shivaji maharaj jayanti 2023
#Dhule धुळेः कुळवाडीभूषण छ. शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आ.फारुख शाह यांनी समस्त शिवप्रेमी जनतेला शुभेच्छा दिल्या.
एका बाजूला देशात सामान्य जनता महागाईने होरपळत आहे, बेरोजगारीने कळस गाठलेला आहे तर दुसऱ्या बाजुला सत्ताधारी जनतेच्या प्रश्नांना बगल देवून धार्मिक उन्माद पसरविण्यात मश्गूल आहेत. अशा काळात छ. शिवरायांचे रयतेचे हित जोपासण्याच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित होते. आज शिवबा असते तर त्यांनी जनताद्रोही सत्ताधाऱ्यांचा रायगडावरून कडेलोट केला असता. त्यामुळे आजच्या काळात कुळवाडीभूषण छ. शिवाजी महाराज यांचे विचार, त्यांचा राजकीय व्यवहार, अर्थनिती, शेती धोरण याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन आ. फारुख शाह यांनी केले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त धुळेकरांनी जल्लोषात अभिवादन केले. आमदार फारुख शाह यांच्यासह विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकार्यांनी शिवरायांना अभिवादन करीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
धुळे शहरातील पारोळारोड, चाळीसगाव रोड तसेच शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या शिवरायांच्या स्मारक स्थळी जनसागर लोटला होता. शिवरायांना अभिवादन केल्यानंतर सायकल, दुचाकी रॅली काढली. या रॅलींनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तर सायंकाळी विविध भागातून सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. रविवारी सकाळपासूनच शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी उत्साह, आनंदाचे वातावरण होते. पारोळा रोड, चाळीसगाव रोडवर
असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात आकर्षक सजावट केली होती. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लहान बालकांपासून ते वयोवृध्दांनीही ‘जाणता राजा’ला अभिवादन केले.
Editor
Sunil Ananda Baisane
No1 Maharashtra