#The riot has started, who will beat whom? Let’s go to the wrestling arena!
सुरु झालीय दंगल, जिगरबाज परफाॅरमन्स होणार कुस्त्यांचा, कोण करणार कोणावर मात? जाऊया कुस्तीच्या आखाड्यात!
#Dhule Sports धुळे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. खाशाबा जाधव (khashaba jadhav) चषक कुस्ती स्पर्धांचा धुळ्यात बुधवारी शानदार शुभारंभ झाला. या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत.
खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महाराष्ट्र केसरीची हॅट्र्टीक करणारे विजय चौधरी, जय मल्हार फेम अभिनेते देवदत्त नागे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांना सुरुवात झाली.
दहा जिल्ह्यांमधून 300 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तीन दिवस चालणाऱ्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना ३५ लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. धुळे शहरातील गरुड मैदान येथे बुधवारपासून कुस्त्यांची दंगल सुरु झाली आहे. धुळे जिल्ह्यात 19 वर्षानंतर कुस्ती स्पर्धा होत असून, यामुळे जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (#vijay chaudhari) यांनी अहिरानी भाषेतून मनोगत व्यक्त केले. आयोजकांचे कौतुक करीत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
अभिनेते देवदत्त नागे (#deodatta nage) यांनी व्यायाम आणि खेळांचे महत्व सांगातले.
खेळांमुळे व्यक्तीमत्व विकास होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
धुळे जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी घडावेत, येथील खेळाडूंनी आॅलिम्पीक मेडल आणावे, अशी अपेक्षा खासदार सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.