Bronze medal to Sakshi Shinde of Dhule धुळ्याच्या साक्षी शिंदेला कांस्य पदक, नगरच्या चैतालीला केले चितपट
#Dhule धुळेः येथील गरुड मैदानावर आॅलिम्पियन खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांच्या दंगली जोरात सुरु आहेत. दुसर्या दिवशी धुळ्याच्या पैलवानांनी तीन पदकांची कमाई केली. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. #olimpion khashaba jadhav rajyastariy kusti spardha dhule
महिलांच्या 55 किलो वजनगटात धुळ्याच्या साक्षी शिंदे (#sakshi shinde) हिने नगरच्या चैतालीवर मात करून कांस्य पदक मिळविले. तर ग्रिकोरोमन प्रकारात 67 किलो वजनगटात धुळ्याचा रोहित शिंदे याने जळगावच्या अरबाज पठाणला चितपट करीत कांस्य पदक मिळविले. तसेच फ्री स्टाईल प्रकारात 61 किलो वजनगटात पुणे कॅन्टोन्मेंटचा भालचंद्र याने धुळ्याच्या नबील शहावर मात करून सुवर्ण पदक मिळविले. नबील शहाला रौप्य पदक मिळाले.
दुसर्या दिवसाचे फायनल विजेते असेः महिला प्राविण्यधारक कुस्तिगीर यादी अनुक्रमे प्रथम, व्दीतीय आणि विभागून तृतीय अशीः 50 कालो वजन गटः नेहा चौगुले (कोल्हापूर जिल्हा), समृध्दी घोरपडे सांगली, श्रुती येवले पुणे शहर, गौरी पाटील कोल्हापूर शहर. 53 किलो वजन गटः स्वाती शिंदे कोल्हापूर जिल्हा, साक्षी इंगळे पुणे शहर, संस्कृती मुळे सांगली, मेघना सोनुले कोल्हापूर शहर. 55 किलो वजन गटः विश्रांती पाटील कोल्हापूर जिल्हा, अंजली पाटील सांगली, साक्षी शिंदे धुळे. 57 किलो वजन गटः सोनल मंडलिक अहमदनगर, रेणुका महाजन रायगड, तनुजा संकपाळ कोल्हापूर जिल्हा, पूजा राजवडे पुणे जिल्हा. 68 किलो वजन गटः श्रावणी भालेराव पुणे जिल्हा, वैष्णवी सावंत सांगली, कांचन सानप पुणे शहर.
ग्रिकोरोमण प्राविण्यधारक कुस्तिगीर यादीः 55 किलो वजन गटः वैभव पाटील कोल्हापूर, अभिषेक शैली पुणे शहर, वैभव जाधव अहमदनगर, विशाल सुर्वसे सोलापूर. 60 किलो वजन गटः प्रवीण पाटील कोल्हापूर, संतोष हिरगुंडे कोल्हापूर, बापू कोळेकर मुंबई उपनगर, शुभम मोरे नाशिक. 63 किलो वजन गटः गोविंद यादव मुंबई उपनगर, योगेश चंदेल अहमदनगर, आदेश इंगळे कोल्हापूर, संदीप बोडके नाशिक. 67 किलो वजन गटः भाऊराव संदगीर नाशिक, अनिकेत मगर सोलापूर, तुषार माने मुंबई शहर, रोहित शिंदे धुळे.