Two friends arrested in case of murder of Satish Mistry in Mohadi बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्रानेच कापला मित्राचा गळा; सतिष मिस्तरी खुनाचा 24 तासात उलगडा
#dhule crime धुळेः येथील मोहाडी उपनगर शिवारातील एका शेतात अज्ञात इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यात ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला होता, त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते. अगदी क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या खुनाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला असून यात 21 वर्षीय आरोपीला औरंगाबाद येथून अटक केली.
मोहाडी उपनगर परिसरात सतिष बापू मिस्तरी (वय 22, रा. मोहाडी) या तरुणाचा बुधवारी दुपारी गळा चिरुन खुन करण्यात आला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळल्यानंतर मोहाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी दारुच्या बाटल्या आणि ग्लास सापडल्याने पार्टीनंतर मिञांनीच त्याचा खून केला असावा असा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरउन चेतन प्रताप गुजराती (वय 21, रा. मोहाडी) या संशयिताला औरंगाबाद #aurangabad येथून अटक केली. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे.
या गुन्ह्यातील अन्य एक संशयित दुसरा आरोपी विधी संघर्ष बालक याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बहिणीची छेड काढण्याच्या रागातून मित्रानेच मित्राचा गळा चिरून खून केल्याची ही धक्कादायक घटना आहे. या घटनेतील मयत सतीश मिस्तरी याला आरोपी चेतन गुजराती यांने दुपारी एक वाजेच्या सुमारास पार्टी करण्यासाठी एका शेतात बोलावून, ब्लेडच्या सहायाने त्याचा गळा चिरला. नंतर दगडाने ठेचले. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
I was extremely pleased to find this web site. I wanted to thank you for your time for this particularly fantastic read!! I definitely appreciated every part of it and I have you saved to fav to see new information in your site.
Nice post. I learn something totally new and challenging on sites I stumbleupon everyday. It will always be exciting to read content from other writers and practice a little something from other sites.
Greetings! Very useful advice within this article! Its the little changes that will make the greatest changes. Thanks a lot for sharing!
Next time I read a blog, Hopefully it wont fail me just as much as this particular one. After all, Yes, it was my choice to read through, however I actually thought you would have something useful to say. All I hear is a bunch of whining about something you could fix if you werent too busy looking for attention.