Give reservation in promotions, fill backlog of backward classes quickly, strong protests by Kastraib employees’ federation पदोन्नती आरक्षण द्या, मागासवर्गीयांचा अनुशेष त्वरीत भरा, कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जोरदार निदर्शने
#Dhule News धुळेः पदोन्नतीतील आरक्षण व मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याबाबतची टाळाटाळ या राज्य शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व संलग्न शाखांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी ‘लोकशाही की पेशवाई’ या बॅनरखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
धुळे शहरात देखील धरणे आंदोलन झाले. कर्मचार्यांनी क्युमाईन क्लबजवळ जोरदार निदर्शने केली. त्यानंतर निवासी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिले. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पदोन्नती आरक्षण त्वरीत लागु करावे, जुनी पेन्शन योजना लागु करावी, सरळसेवा भरतीमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव पदांचा अनुशेष व रिक्त पदे त्वरीत भरावी, वाहनचालक, परिचर व इतर पदे कंञाटी पध्दतीने न भरता सरळ सेवेने भरावी या प्रमुख मागण्या आहेत. निवेदन देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. आखाडे, जिल्हा कार्याध्यक्ष दुर्गेश बोरसे, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुनंद भामरे, मधुकर निकुंभ, शिरीष जाधव, किशोर पगारे, लक्ष्मीकांत चव्हाण, अनिल चव्हाण, अरविंद मोरे, अशोक सूर्यवंशी, प्रशांत वळवी, भरत माळी, महिला संघटक बबीता पटवे, आशा चव्हाण, कविता गवळे, रोशणी शिरसाठ, शोभा वाघ आदी उपस्थित होते.
Editor
Sunil Ananda Baisane
No1 Maharashtra