Under the ‘Chief Minister’s Medical Room at Your Doorstep’ initiative, village-to-village awareness, assistance up to eight lakhs for surgery for various chronic diseases ‘मुख्यमंञी वैद्यकीय कक्ष आपल्या दारात’ उपक्रमांतर्गत गावागावात जागृती, विविध दूर्धर आजारांवरील शस्ञक्रियेसाठी आठ लाखांपर्यंतची मदत
#Dhule धुळेः मुख्यमंञी वैद्यकीय कक्ष आपल्या दारात या उपक्रमांतर्गत महाएनजीओ फेडरेशन आणि मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय कृषी व पशुसंशोधन संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंञी वैद्यकीय सहायता निधीविषयी गावागावात जनजागृती सुरु आहे.
धुळे येथे जयहिंद शाळेत आणि नगाव ता. धुळे येथे सोमवारी कार्यक्रम घेउन गुंताबाई आखाडे संस्थेचे अध्यक्ष डाॅ. डी. एम. आखाडे यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन मुख्यमंञी सहायता निधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विविध प्रकारच्या दूर्धर आजारांवरील शस्ञक्रियेसाठी मुख्यमंञी वैद्यकीय सहायता निधीतून आठ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी मातोश्री गुंताबाई आखाडे संस्थेकडून अर्जाचा नमुना प्राप्त करुन घ्यावा. डाॅक्टरांच्या कोटेशनसह आमदार किंवा खासदारांच्या शिफारसीने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रस्ताव सादर केला जातो. मंजुरी मिळाल्यावर आठ लाख रुपयांपर्यंतचे बील संबंधित रुग्णालयाला अदा केले जाते.
जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. डी. एम. आखाडे यांनी केले आहे.
धुळ्यातील जयहिंद शाळेत झालेल्या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य एस. व्ही. बैसाणे, पर्यवेक्षक व्ही. टी. गवळे, एस. डी. मोरे, कला शिक्षक ए. के. तावडे, शिक्षिका शर्मिला निकुंभ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.