water suplay after three days आठ दिवसात पाणी गळती थांबवा! अन्यथा कारवाई, महापौरांचा आठ दिवसात पाणी गळती थांबवा! अन्यथा कारवाई, महापौरांचा इशारा
धुळेः शहरातील पाणीपुरवठा पाईपलाईन आणि व्हाॅल्वची गळती आठ दिवसांच्या आत थांबविली नाही तर ठेकेदारासह संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापौर प्रतिभा शिवाजीराव चौधरी यांनी दिला. अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
धुळे शहरातील पाणी पुरवठा वितरण वाहिनीवरील लिकेजेसबाबत मंगळवारी महापौरांनी आढावा बैठक घेतली.
एकदा काढलेले लिकेजेस एक वर्षापर्यंत तरी निघणार नाही यांची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहिल. संबंधित ठेकेदार यांना यादी दिल्याप्रमाणे काम करणे, व्हॉल्वमन व फिटर यांनी पाणी सोडल्यानंतर त्या भागातील लिकेजेसची माहिती संबंधित ओव्हरसियर यांना देणे, मुख्य वितरण वाहिनीवरील नळ कनेक्शन बंद करणेबाबत कार्यवाही करणे, शहरात किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल यादृष्टीने नियोजन करणे, तांत्रिक मनुष्यबळ, सुरक्षारक्षक यांची उपलब्धता करणे, रस्त्यांची व लिकेजेसची कामे गुणवत्तापुर्ण करणे व या संपूर्ण बाबीचा अहवाल आठ दिवसांच्या आत सादर करणेबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. याकामात कोणताही हलगर्जीपणा व दिरंगाई सहन केली जाणार नाही. पाण्याच्या अपव्ययास संबंधित ठेकेदार व अधिकारी जबाबदार राहातील असे आदेश महापौरांनी दिले.
तसेच देवपूर भागात सावरकर पुतळाजवळ महिलांसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती करणे तसेच दत्तमंदिर ते नगांवबारी या परीसरातील भाजी व फेरीवाला विक्रेते यांचे स्थंलातर करून भाजी मंडईची निर्मिती करणे याबाबत चर्चा करून त्यासाठी विहित कालमर्यांदा निश्चित करण्यात आली.
तसेच नव्याने बांधण्यात आलेले नेहरूनगर, रामनगर जलकुंभ सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्यासाठी करावयाची कार्यवाही याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीत महिला व बालकल्याण समिती सभापती सारीका प्रविण अग्रवाल, नगरसेवक साबीर खान, वसीम बारी, उपायुक्त विजय सनेर, अभियंता कैलास शिंदे, मुख्य लेखाधिकारी गजानन पाटील, नगरसचिव मनोज वाघ, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, प्रदीप चव्हाण, एन. के. बागुल, हेमंत पावटे, कमलेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, यांच्यासह ठेकेदार व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.