धुळे (Dhule): आम्ही धुळेकर (Amhi-dhulekar) संस्थेच्या माध्यमातून मिल परिसरातील दिव्यांग गॅरेज चालकाला वॉकर आणि शौचाची खुर्ची या वस्तूंची मदत करण्यात आली. आम्ही धुळेकर संस्थेच्या माध्यमातून नेहमीच लोकोपयोगी व समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
दीपक घेर यांना आजारपणात उजवा पाय गमवावा लागला होता. तेव्हापासून त्यांचा गॅरेजचा व्यवसाय बंद पडलेला आहे. त्यांची दोन्ही मुले अद्याप कॉलेजचे शिक्षण घेत आणि दोघेही बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत दीपक घेर यांच्या आजारामुळे परिवारावर संकटच आलेलं होते. आम्ही धुळेकरचे संस्थापक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाळणकर यांच्याकडे मोटरसायकल गॅरेजचे चालक दीपक घेर यांनी वाॅकर व शौचाच्या खुर्चीची मदत मागितलेली होती. दोन वर्षांपूर्वी अशा संकटाच्या समयी आम्ही धुळेकरच्या वतीने त्यांना या दोन वर्षाच्या कालावधीत किराना सामानसह काही मदत करण्यात आलेली आहे आणि दि.३१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता मुख्याधापक विजयकुमार निकुंभे, ज्येष्ठ पत्रकार छोटूलाल मोरे, श्रीकृष्ण बेडसे यांच्या हस्ते दीपक घेर यांना शौचाची खुर्ची व वाॅकर मदत म्हणून देण्यात आली. भविष्यात देखील त्यांना आवश्यक मदत करण्यात येईल असे आश्वासन संस्था प्रमुख धनंजय गाळणकर यांनी दिले. या पक्रमासाठी युवा उद्योजक गौरव जगताप, सामाजिक कार्यकर्ते रवी शर्मा, ललित विभुते आणि साक्री येथील सामाजिक कार्यकर्त्या जोशीलाताई पगारिया यांनी आर्थिक योगदान दिले.
यावेळी पारस देवपूरकर, अण्णासाहेब कणसे, युवा उद्योजक निरज शहा, जोशीलाताई पगारिया (joshila pagariya), सामाजिक कार्यकर्ते रवी शर्मा, ललित विभुते, सुरेश बैसाणे, पंचायत समिती सदस्य प्रकाश गायकवाड, लोकशाहीर श्रावण वाणी, प्रेस फोटोग्राफर लोकेश सोनवणे, रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते.













