• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home क्राईम

Dhule Crime News सरपंच महिलेसह मुलाला मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा

no1maharashtra by no1maharashtra
16/12/2023
in क्राईम, धुळे
0
Dhule Crime News सरपंच महिलेसह मुलाला मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरपंच महिलेसह मुलाला मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा

शिरपूर : शेतात गाय, वासरू शिरल्याच्या कारणावरून सरपंच महिलेसह मुलाला मारहाण करणार्‍या दाम्पत्यावर थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धनपूर (ता. शिरपूर) येथील सरपंच सरला पांडुरंग धनगर (वय 56) यांच्या फिर्यादीनुसार, वरील कारणावरून त्यांच्यासह मुलाला निलेश दिलीप धनगर व  मिराबाई दिलीप धनगर (रा. असली, ता. शिरपूर) यांनी शिवीगाळ केली. निलेश याने काठीने बेदम मारहाण करीत जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

No.1 Maharashtra

शेतकऱ्याच्या घरातून 29 हजाराचा ऐवज चोरला

दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील मंदाणे येथील भबुता संपत माळी या शेतकर्‍याच्या घरात चोरी झाली.
5 डिसेंबर रोजी रात्री दहा ते 6 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधील 15 हजारांची रोकड, 14 हजार 350 रूपये किंमतीच्या 70 भार वजनाचे हातातील चांदीचे कडे असा एकुण 29 हजार 350 रूपयांचा ऐवज चोरून नेला. माळी यांच्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस नाईक अभय गवते करीत आहेत.

No.1 Maharashtra

सासुला मारहाण करणाऱ्या सुनेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

धुळे : घरागुती भांडणावरून सासुला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सुनेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शालिनी दिलिप साळवे (वय 55, रा. प्लॉट नं. 14, सिंचय कॉलनी, वलवाडी, चावरा हायस्कूलजवळ, देवपूर) या महिलेने पश्‍चिम देवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, घरगुती भांडणाच्या कारणावरून 9 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुन माधुरी प्रविण साळवे, माधुरीची आई, मोठी बहिण, पाहुणे, दोन भाऊ सर्व (रा. साक्री रोड, धुळे) यांनी घरात घुसून हाताबुक्यांनी मारहाण केली. तर माधुरीचे पाहुणे याने शालिनी साळवे यांचे डोके भितींवर आपटले. तसेच शिवीगाळ करीत धमकी दिली. वरील संशयितांविरूध्द गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल एम. बी. पाटील करीत आहेत.

N0.1 Maharashtra

नाशिकच्या तरूणाचा धुळ्याच्या हॉटेलमध्ये नग्नावस्थेत मृतदेह

धुळे : नाशिक येथील तरूणाचा शहरातील देवपूर भागातील एका हॉटेलच्या खोलीत नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला.अमेय नंदकिशोर वैद्य (वय 35, रा. योगेश्‍वर कॉलनी, हॉटेल सूर्यामागे, इंदिरानगर, सिडको, नाशिक) असे त्याचे नाव आहे. तो 12 डिसेंबर रोजी देवपूरातील नगावबारी चौफुलीवरील एका महागड्या हॉटेलमध्ये ऑनलाईन बुकींग करुन आला होता. रूम नं. 407 या ठिकाणी तो थांबला होता. सायंकाळी सात वाजता तो रूममधून खाली आला. यानंतर त्याच्या मित्रांसोबत तो जवळील रेस्टॉरंटमध्ये गेला. रात्री 9 वाजून 23 मिनिटांनी त्याने जेवणाचे बिल दिले. यानंतर तो खोलीत गेला.

परंतु काल 13 डिसेंबर रोजी तो पुन्हा खाली आला नाही. याचवेळी त्याचा मित्र विजय मगर याचा हॉटेलवर फोन आला. अमेय फोन उचलत नसल्यामुळे तुम्ही रूमध्ये जावून त्याला फोन करायला सांगा, असे सांगितले. त्यानंतर हॉटेलमधील वेटर मंजीत व इतरांनी आवाज देऊनही खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना बोलवले. दार उघडून पाहिल्यावर अमेय हा नग्नावस्थेत मृत आढळून आला. त्याच्या पाठीमागील भाग लालसर, हाताची नखे काळसर व निळी पडली होती. त्याच्या मृत्यूचे कारण समजु शकले नाही. याप्रकरणी देवपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल मोराणीस करीत आहेत.

N0.1 Maharashtra

भरधाव कारच्या धडकेत तरूण ठार

धुळे : तालुक्यातील गोंदूर-मोराणे रोडवरील पोल्ट्री फार्मनजीक भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला.
राकेश प्रमोद सूर्यवंशी (वय 34, रा. वाडीभोकर, गोंदूर रोड, मराठी शाळेजवळ, देवपूर, धुळे) असे त्याचे नाव आहे. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास एम. एच. 18 ए. के. 6441 क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. गोंदूर-मोराणे रोडवर मागून भरधाव येणार्‍या एम. एच. 39 जे. 2882 क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. त्यात  गंभीर जखमी होवून राकेशचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक पसार झाला.
याबाबत सतिष प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्‍चिम देवपूर पोलिसात कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

No.1 Maharashtra

रेल्वे अपघातात युवक ठार

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथे रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू झाला. अजय संजय सोनवणे (वय 18, रा.वरूळ घुसरे, ता. शिंदखेडा) असे त्याचे नाव आहे. तो 13 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बकर्‍या चारण्यासाठी गेला होता. रेल्वे रूळाच्या बाजुला जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.

No.1 Maharashtra

गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

धुळे : शहरातील मिल परिसरातील जय मल्हारनगरात प्रशांत गोरख वाघ (वय 37) या तरूणाने स्कार्पने गळफास घेत आत्महत्या केली. 13 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यास हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शहर पोलिसात नोंद झाली असून, पुढील तपास हेड काॅन्स्टेबल मोरे करीत आहेत.

No.1 Maharashtra

Tags: Crime against couple for beating woman and childdhule crimedhule newsसरपंच महिलेसह मुलाला मारहाण दाम्पत्यावर गुन्हा
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule Crime धुळे जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींना पळविले

Next Post

MLA Kunal Patil आदिवासी शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us