हिरे रूग्णालयाच्या समस्या सोडवा! मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
धुळे : भाऊसाहेब हिरे मेडीकल कॉलेजच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ. फारूक शाह यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे विशेष बैठक आयोजित करणेबाबत मागणी केली होती. त्यानुसार हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२ डिसेंबर रोजी हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा होवून हसन मुश्रीफ यांनी सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिका-यांना दिले.
धुळे शहरातील व गुजरात, मध्यप्रदेश सिमेला लागून असलेल्या हिरे मेडीकल कॉलेज येथे गरीब व अपघातग्रस्त रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार होत असतात. परंतु या रुग्णालयात मुलभूत सोयी-सुविधांच्या अभावाने तसेच पुरेशा औषधसाठा उपलब्ध नसल्याने, डॉक्टरांची कमी संख्या तसेच कर्मचारी कमी असल्यामुळे रुग्णांवर योग्य ते उपचार वेळेवर न झाल्यामुळे अनेक रुग्ण दगावले. या रुग्णालयात कायमस्वरुपी अधिष्ठlता नसल्यामुळे प्रशासनावर कोणाचीच पकड नसल्यामुळे या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णाचे हाल होत आहे. प्रसुती विभागात अनेक बालके यापूर्वी दगावलेले आहे. सीटी स्कॅन व एमआरआय माशिन कार्यन्वित नसल्यामुळे अनेक रुग्णांना बाहेरून रिपोर्ट काढून आणावे लागत आहे. तसेच पुरेशा मनुष्यबळा अभावी संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

याबाबत आ. फारुख शाह यांनी हसन मुश्रीफ यांना भेटून या समस्याबाबत बैठक आयोजित करणेबाबत मागणी केली होती. त्यासंदर्भात हिरे मेडिकल रुग्णालयातील वर्ग ४ ची रिक्त पदे, हाउस कीपिंग, कायमस्वरूपी अधिष्ठाता नेमणूक करणे. C.T.Scan मशिन आणि M.R.I. मशिन खरेदी करणे या प्रमुख सामस्यांबाबत चर्चा झाली. तातडीने C.T.Scan मशिन आणि M.R.I. मशिन खरेदी करण्याचे आदेश हसन मुश्रीफ यांनी दिले. तसेच महाविद्यालयात तत्काळ कायम स्वरूपी अधिष्ठाता देण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली असून याबाबतची कार्यवाही तातडीने पार पाडावी असे आदेश देण्यात आले.














