भाजपाच्या किल्ले प्रतीकृती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षपूर्तीनिम्मित भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता पांझरा नदीकाठी धुळे येथे किल्ले प्रतिकृती तयार करणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमात एकूण 20 संघ आणि त्यात 85 मुला-मुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीप्रत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, भाजयुमो सरचिटणीस पंकज धात्रक, आदर्श शिक्षण प्रसारक संस्था अध्यक्ष महेंद्र विसपुते, अनिल दिक्षीत, निकम पॉलिटेक्निकचे रवींद्र निकम, लळींग किल्ला संवर्धन समितीचे संदीप पाटोळे, राहुल क्षीरसागर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांची मुलांना माहिती व्ह्यावी हा हेतू स्पर्धेच्या आयोजनामागे होता. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाला भरगोस प्रतिसाद दिला. त्याबद्दल उपक्रम प्रमुख विनायक चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. प्रदीप लोहार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.














