MLA Kunal Patil Aggressive Posture for Anganwadi Workers’ Demands, Agitation on the Steps of Vidhan Bhavan
MLA Kunal Patil अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा, विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन
#mumbai मुंबई: राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी आ.कुणाल पाटील हे आज आक्रमक झालेले पहायला मिळाले.मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार सभात्याग करीत त्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करीत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नाव्दारे आवाज उठवित अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करीत त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. आज दि.3 मार्च रोजी सकाळी अधिवेनशनाचे कामकाज सुरु झाल्यानंतर आजचा दिवस वादळी ठरला. दरम्यान अंगणावाडी कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत विधानसभेत चर्चा सुरु झाली. मात्र चर्चेत मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग करीत विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले. यावेळी धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील हे चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.
विधानभवनाच्या पायर्यांवर उभे राहून आ.कुणाल पाटील आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी आमदारांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे अंगणावाडी कर्मचार्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी आज दि.3 मार्च रोजी विधानसभेत तारांकीत प्रश्न क्र.56567 नुसार राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मागण्यांबाबतचे प्रश्न उपस्थित केले.यावेळी आपल्या तारांकीत प्रश्नांच्या भाषणात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, शासनाच्या किमान समान कार्यक्रमानुसार अंगणावाडी कर्मचार्यांना किमान वेतन श्रेणीतील शिफारशीप्रमाणे अंगणवाडी कर्मचार्यांना 18 हजार रुपये दरमहा वेतन द्यावे किंवा त्यांना तृतीय श्रेणी अथवा चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करुन त्यानुसार फायदे व भत्ते लागू करण्यात यावेत. कोरोना काळात अंगणावाडी कर्मचार्यांनी स्वताच्या जीवाची आणि परिवाराची पर्वा न करता त्यांनी कार्य केले.यावेळी अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर ह्यांनी कोराना विरोधात लढा दिला होता. ग्रामीण भागातील जनतेला खर्या अर्थाने धीर देण्याचे काम त्यांनी केले होते. तेव्हा केंद्र सरकारने एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहिर केले होते. मात्र अद्याप त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. म्हणून त्यांना पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा.
सर्वोच्च न्यायालयाने दि.25 एप्रिल 2022 रोजी ग्रॅच्यूईटी तत्काळ चालू करावी असा निकाल दिला होता त्या निर्णयाचीही अंमलबजावणी करावी. यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांच्या उर्वरीत सर्व मागण्या रास्त असून त्या मान्य कराव्यात अशी मागणी करीत आ.कुणाल पाटील यांनी अंगणवाडी कर्मचार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कोणती कार्यवाही करीत आहे? याबाबत विधानसभेत खुलासा करावा अशीही मागणी आ.पाटील यांनी केली. संपाला पाठींबा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्यावतीने अंगणवाडी कर्मचार्यांच्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत संप सुरु आहे. आ.कुणाल पाटील यांनी दि.2 मार्च रोजी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांना भेट दिली. यावेळी आ.पाटील यांनी संपाला पाठींबा जाहिर केला.यावेळी अंगणवाडी कर्मचार्यांचे प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानुसार आज दि.3 मार्च रोजी आ.पाटील यांनी विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर अंगणवाडी कर्मचार्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला होता.













