• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home राजकारण

धनुष्यबाण चोरणार्‍यांविरोधात जोरदार आंदोलन, निवडणुकीच्या तयारीला लागा! उध्दव ठाकरेही आक्रमक no1maharashtra #News Updates

no1maharashtra by no1maharashtra
18/02/2023
in राजकारण, राज्य
0
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धनुष्यबाण चोरणार्‍यांच्या विरोधात जोरदार आंदोलन,

निवडणुकीच्या तयारीला लागा! उध्दव ठाकरेही बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये आक्रमक

# Mumbai/Dhule मुंबई/धुळेः राज्याच्या सत्ता संघर्षात निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटांकडून जोरदार जल्लोष झाला. दरम्यान, धनुष्यबाण चोरणार्‍यांच्या विरोधात शिवसेनेचा ठाकरे गट (thakare gat) आक्रमक झाला असून, धुळे शहरात शनिवारी मोदी सरकार (modi sarkar), शिंदे सरकार (shinde sarkar) आणि निवडणूक आयोगाच्या (election commission) निकालाविरुध्द जोरदार घोषणाबाजी करीत बॅनर झळकविण्यात आले.

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्मरणार्थ बॅनरबाजी करीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून ते जुन्या महानगरपालिकापर्यंत जोरदार घोषणाबाजी केली. निवडणूक आयोग, प्रधानमंञी नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे हिलाल माळी, अतुल सोनवणे, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, महेश मिस्तरी, हेमंत साळुंखे, प्रफुल्ल पाटील, शुभांगी सूर्यवंशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे (uddhav thakare) यांनी मातोश्री निवासस्थानी (matoshree) जमलेल्या शिवसैनिकांना ओपन जीपमधून संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रथमच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (pm modi) हल्लाबोल केला. धनुष्यबाण चोरलंय ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन लढा देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. चोरबाजाराचे मालक धनुष्यबाण (dhanushyaban) पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण चिडलेले आहात. देशातील असा कोणताही पक्ष नसेल ज्यावर असा आघात झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंत्रणांचा वापर करुन पक्ष संपवता येतात असं वाटत असतील तर त्यांना सांगतो शिवसेना संपवता येणार नाही. तुमच्या किती पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, पक्ष पाहिजे. शिवसेनेचं कुटुंब त्यांना नकोय. बाळासाहेबांचा मुखवटा घालून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतंय ही आपली ताकद आहे. ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपलं धनुष्य बाण चोरांना दिला गेला. ज्या पद्धतीनं हे कपटानं राजकारण करतात त्या पद्धतीनं मशाल चिन्ह देखील घालवतील. पण, धनुष्यबाण चोरलंय त्यांना सांगतो तुमच्यापुढं मशाल चिन्ह घेऊन लढून दाखवतो. मी कुठं खचलेलो नाही, खचणार नाही, तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. काँग्रेस देखील फुटली होती त्यावेळी त्यांचं चिन्ह गोठवलं गेलं होतं. समाजवादी पक्षाच्या वेळी पुढच्या पक्षानं दावा सोडला त्यावेळी चिन्ह दिलं गेलं.जयललितांच्या वादावेळी वाद मिटल्यानं चिन्ह आणि नाव राहिलं. पण, पंतप्रधानांच्या गुलामानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. ते गुलाम उद्या राज्यपाल होतील, एक न्यायमूर्ती देखील राज्यपाल झाल्याचा दाखला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. माझ्या हातात काही नाही पण एवढंच सांगतो. तरुण रक्त त्यांनी चेतवलेलं आहे. आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. मी तुम्हाला भेटायला रस्त्यावर आलेलो आहे. खांद्याला खांद्याला लावून शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेऊन चोरांना धडा शिकवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या किती पिढ्या आल्यातरी तुम्ही शिवसेनेला संपवू शकणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT
Previous Post

वडजाई दर्ग्यासाठी होणार काॅंक्रिटचा रस्ता, आमदारांनी केला कामाचा शुभारंभ no1maharashtra #News Updates

Next Post

दिड लाखाचा आयफोन, रडणारी रिचा अन् डी. के. भाई… no1maharashtra #News Updates

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
दिड लाखाचा आयफोन, रडणारी रिचा अन् डी. के. भाई… no1maharashtra #News Updates

दिड लाखाचा आयफोन, रडणारी रिचा अन् डी. के. भाई... no1maharashtra #News Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us