भाजप अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रयत्नांमुळेच पाचकंदिल मार्केट व दसरा मैदानाच्या विकासाचे प्रयत्न मार्गी !
धुळे : भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पाचकंदिल मार्केटचे नुतनीकरण व दसरा मैदान विकासाचे काम मार्गी लागणार आहे. त्यांच्या या भुमिकेचे महापालीकेत नुकत्याच झालेल्या महासभेत महापौरांसह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी एकमुखाने कौतुक केले.
पाच कंदिल परिसरातील मार्केटच्या तत्कालीन ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत नुतनीकरण काम अपूर्ण ठेवुन ‘चोराच्या उल्ट्या बोंबा’ या न्यायाने मनपावर सुमारे 32 कोटी रुपयांचा दावा ठोकला होता. या बाबतीत मनपा प्रशासनाला धारेवर धरीत भाजप महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकरांनी त्या ठेकेदाराविरुध्द न्यायालयात दावा दाखल करण्याची भुमिका घेतली.
महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त अमिता दगडे-पाटील, उपमहापौर वैशाली वराडे, स्थायी समिती अध्यक्षा किरण कुलेवार, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, सुनिल बैसाणे आदी मान्यवरांच्या सहकार्याने संमती मिळवली. याबद्दल धुळेकर जनता गजेंद्र अंपळकरांचे कौतुक करीत आहे.
धुळे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या व व्यापारी वर्गाच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणाऱ्या तसेच राजमार्गावरील अडथळे दूर होऊन वाहतुक सुरळीत होणार असल्याचे सुतोवाच गजेंद्र अंपळकरांनी केले आहे.
याकामी धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख राजवर्धन कदमबांडे या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले, असे गजेंद्र अंपळकर यांनी सांगितले.