भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जिवनकार्य देशासाठी सदैव प्रेरणादायी : गजेंद्र अंपळकर
धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगर कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पुष्पहार अर्पण केले.

यावेळी बोलतांना भाजप अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या देशाच्या घटनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सर्वधर्म व सर्व स्तरातील नागरिकांना समान हक्क प्रदान केले. त्यांनी तळागळातील दीन-दलितांच्या उत्थानासाठी केलेले कार्य अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन अंपळकरांनी केले.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, संदीप बैसाणे, जिल्हा प्रवक्ते शाम पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस पंकज धात्रक, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापुरकर, प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामण गवळी, ज्येष्ठ नगरसेवक सुनिल बैसाणे, प्रदीप पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुकुंदे, ॲड. किशोर जाधव, खासदार यांचे स्विय सहायक श्री. शांताराम पाटील, उन्नीकृष्णन नायर, मंडल अध्यक्ष श्री. अमोल मासुळे, श्री. सुबोध पाटील, बबनराव चौधरी, ईश्वर पाटील, श्री. आण्णा खेमणार, श्री. भागवत चितळकर, श्री. रमेश करणकाळ, श्री. सनी वाडेकर, श्री. नरेश हिरे, श्री. नरेश गवळी, अनुसुचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष श्री. पापा मगरे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. मोहिणी धात्रक, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कपिल, कार्यालय प्रमुख श्री. प्रकाश उबाळे, जिल्हा सह-प्रसिध्दी प्रमुख श्री. अनिल सोनार, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. आकाश धापटे, श्री. अग्रवाल नगर मंडल सरचिटणीस श्री. योगेश वाणी, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री मतीन खाटीक उपस्थित होते.















